लग्नाच्या वऱ्हाडासाठी रेल्वेची खास सुविधा, बुक करू शकता पूर्ण डबा; फक्त हे फॉलो करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 18:17 IST
1 / 8जर तुम्हाला लग्नाचं मोठं वऱ्हाड एका शहरातून दुसऱ्या शहरात घेऊन जायचं असेल, सोबत कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांना कार किंवा बसने लांबचा प्रवास करणं शक्य नाही. तर टेन्शन कशाला घेता, तुम्ही सर्व लोकांना एकत्रित रेल्वेने घेऊन जाऊ शकता. त्यासाठी भारतीय रेल्वे तुम्हाला खास सुविधा देते.2 / 8रेल्वे वऱ्हाड किंवा एकत्र प्रवास करणाऱ्या ग्रुपसाठी फुल ट्रेन बुकींगची सुविधा रेल्वेकडून मिळते. त्यात तुम्ही सहजपणे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाऊ शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ट्रेनमधील कुठलाही डबा बुकींग करू शकता. त्यासोबतच तुम्हाला बुकींग कन्फर्म होण्यासाठी फार प्रतिक्षाही करावी लागणार नाही.3 / 8सध्या लग्नासाठी डेस्टिनेशन वेडिंग खूप ट्रेडिंगमध्ये आहे. एखाद्या पर्यटनस्थळी किंवा बीचकिनारी लग्न करणाऱ्या जोडप्यांना लग्नातील पाहुणे, कुटुंब यांना सोबत घेऊन जाण्यासाठी ही सुविधा आहे. त्यासाठी तुम्हाला ट्रेन कशी बुक करायची, त्यासाठी किती खर्च येतो, काय आहे पूर्ण प्रक्रिया हे जाणून घेऊया. 4 / 8या बुकींगसाठी तुमच्याकडे २ पर्याय आहेत. पहिला पर्याय तुम्ही वऱ्हाडासाठी पूर्ण डबा म्हणजे कोच बुक करू शकता. दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही एकत्र तुम्हाला हव्या तितक्या जागा एकत्रित बुक करू शकता. ज्याचे तिकीट हवं असेल तर रेल्वे तिकिट काऊंटर किंवा घरबसल्या ऑनलाईनही बुक करू शकता. ही सुविधा वऱ्हाडाला आरामदायक आणि सुविधाजनक प्रवास उपलब्ध करून देते.5 / 8ट्रेनचा पूर्ण कोच बुक करण्यासाठी तुम्हाला IRTC, FTR वेबसाईट www.ftr.irctc.co.in वर जावं लागेल. FTR वेबसाईटवर जाऊन यूजर आयडी बनवावं लागेल. इथं तुम्हाला कोच अथवा ट्रेन बुकिंगचा पर्याय मिळेल. ज्यावर क्लिक करून तुम्हाला सगळ्या डिटेल्स भरून द्याव्या लागतील.6 / 8तुम्हाला डिटेल्समध्ये प्रवासाची तारीख, कोचची डिटेल्स हे सर्व भरल्यानंतर याठिकाणी पेमेंट ऑप्शन येईल. पेमेंट पूर्ण भरल्यानंतर कोच बुक होईल. ही सर्व प्रक्रिया सहज आणि खूप वेगाने होते. 7 / 8पूर्ण ट्रेनचा डबा बुकींग करण्यासाठी लागणारा खर्च - ट्रेनचा पूर्ण डबा बुक करण्याची किंमत तुमच्या गरजेवर अवलंबून आहे. तुमच्या प्रवासाची लांबी, ट्रेनमध्ये असणाऱ्या डब्याची संख्या, तिकीटाचे दर आणि अतिरिक्त सुविधेचीही पैसे ज्यात कॅटरिंग, सजावट, सुरक्षा आदी खर्चाचा समावेश असेल8 / 8कोणती गोष्ट लक्षात ठेवाल? - वऱ्हाडासाठी ट्रेनचा डबा बुक करताना कमीत कमी ३०-६० दिवस बुक करा. प्रवासावेळी रेल्वेचे नियम पाळा, जर प्रवास रद्द करायचा असेल तर रेल्वेच्या कॅन्सलेशन पॉलिसीची माहिती करून घ्या. IRCTC अतिरिक्त सेवा कॅटरिग, डेकोरेशन यांचीही माहिती घ्या.