By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 11:42 IST
1 / 9Vande Bharat Sleeper Train: हावडा ते कामाख्या मार्गावर भारताची पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली. संपूर्ण देशात स्लीपर वंदे भारत ट्रेनची चर्चा आहे. दुसरी ट्रेन कधी सुरू होणार याबाबत देशभरातील प्रवाशांना उत्सुकता आहे. आता लवकरच दुसरी वंदे भारत ट्रेन सुरू होणार असल्याचा कयास आहे. कारण एका स्लीपर वंदे भारत ट्रेनला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून, ही वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस ट्रेन मुंबईतून धावणार आहे.2 / 9Mumbai Vande Bharat Sleeper Train: रेल्वेने या वर्षाच्या अखेरीस १२ वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची योजना तयारी केली आहे. या सर्व वंदे भारत ट्रेनची बांधणी वेगाने सुरू आहे. खरे तर दुसऱ्या स्लीपर वंदे भारतची चाचणी पूर्ण झाली आहे. परंतु, ही दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन नेमकी कोणत्या मार्गावर चालवली जाणार, याबाबत अद्याप तरी स्पष्टता नाही.3 / 9Mumbai CSMT To KSR Bengaluru Vande Bharat Sleeper Train: यातच आता रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईतून सुटणाऱ्या वंदे भारत ट्रेनला मंजुरी दिली आहे. याबाबत खासदारांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. खासदारांनी केलेल्या या पाठपुराव्याला यश आले असून, नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन मंजूर केल्याचे पत्र रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदारांना दिले आहे.4 / 9KSR Bengaluru To Mumbai CSMT Sleeper Vande Bharat Train: बंगळुरू सेंट्रलचे खासदार पी. सी. मोहन यांनी मुंबई ते बंगळुरू मार्गावर स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात यावी, या मागणीचा प्रस्ताव रेल्वेला पाठवला होता. या प्रस्तावाला भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, ही मागणी पूर्ण करण्यात आली आहे. 5 / 9जनसुविधेसाठी बेंगळुरू आणि मुंबई दरम्यान नवीन 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन सुरू करण्याबाबत आपल्यात झालेल्या चर्चेचा कृपया संदर्भ घ्यावा. आपल्याला हे जाणून आनंद होईल की, KSR बेंगळुरू आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) यांच्या दरम्यान नवीन 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे, असे पत्र अश्विनी वैष्णव यांनी पी. सी. मोहन यांना पाठवले आहे. 6 / 9रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ०५ एप्रिल २०२६ रोजी खासदार पी. सी. मोहन यांना हे पत्र पाठवले आहे. बेंगळुरू आणि कर्नाटकच्या जनतेच्या वतीने कनेक्टिव्हिटी आणि जनसुविधेत भर घालणाऱ्या 'बेंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर' ट्रेनला मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांचे आभार व्यक्त करतो, असे पी. सी. मोहन यांनी म्हटले आहे.7 / 9दरम्यान, मुंबई ते बंगळुरू मार्गावर धावणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरू होणार? कधी सुटणार? कोणते थांबे असणार? याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. दुसरीकडे, भारतीय रेल्वेने एकूण २६० वंदे भारत स्लीपर ट्रेनसेट्स तयार करण्याची योजना आखली आहे. बेंगळुरू आणि चेन्नई कोच कारखान्यांमध्ये याची बांधणी केली जात आहे. या ट्रेन कवच सुरक्षा प्रणाली आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज असतील.8 / 9प्रवाशांच्या फिडबॅकनुसार भारतीय रेल्वे वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या सेवेत बदलही करत आहे. तसेच २४ कोचच्या स्लीपर वंदे भारत ट्रेनबाबत रेल्वे तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनची प्रचंड मागणी लक्षात घेता, रेल्वे मंत्रालयाने भविष्यात २६० रेक तयार करण्याची योजना अधिकृतपणे जाहीर केली आहे. 9 / 9ICF मध्ये ५० रेक बांधले जातील आणि ते अन्य रॅकपेक्षा वेगळे असतील. या रेकमध्ये २४ कोच असतील ज्यात पेंट्री कार असेल. वंदे भारत स्लीपर ट्रेनचा प्रकल्प प्रोटोटाइप डेव्हलपमेंट, चाचण्या आणि निर्मिती अशा पद्धतीने भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड आणि इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई यांच्या तंत्रज्ञान भागीदारांसह राबविला जात आहे.