By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:40 IST
1 / 10जागतिक हवामान संघटना(WMO) च्या एका नवीन रिपोर्टमध्ये खळबळ माजली आहे. भारताच्या सागरी किनाऱ्यावरील समुद्रातील पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. समुद्रातील पाण्याची पातळी आधीच्या तुलनेने जास्त वेगाने वाढत असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 2 / 10आशियात तापमानात वाढ होत आहे. ज्यामुळे हवामानात बदल पाहायला मिळतोय. हवामान बदलामुळे लोकांना त्याचा फटका बसणार आहे असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. सागरी किनाऱ्यावरील परिसरात या स्थितीमुळे वाईट परिणाम होऊ शकतात. त्याशिवाय सखल भागातही समुद्राचे पाणी भरण्याची शक्यता आहे.3 / 10जागतिक हवामान विभागाच्या ताज्या रिपोर्टनुसार, समुद्राच्या पाण्याची पातळी दरवर्षी ३.७ ते ३.८ मिलीमीटरने वाढत होती. परंतु आता ही पातळी ४.०० मिलीमीटर प्रति वर्ष वाढत आहे. समुद्राच्या पाणी पातळीत होणारी वाढ पाहता किनाऱ्यावरील ५० किमी परिसर धोक्यात येऊ शकतो असा इशारा दिला आहे. 4 / 10मानवी कृत्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमान वाढ होत आहे त्यातून समुद्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. जीवाश्म इंधन जाळल्याने हरितगृह वायू बाहेर पडतात. या वायूंमुळे बर्फाचे थर आणि हिमनद्या अनपेक्षितपणे वितळत आहेत. यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे.5 / 10किनारी भागात आणि लहान बेटांवर राहणाऱ्या लोकांसाठी हा एक मोठा धोका आहे. भारताचा दक्षिण भागावर देखील याचा परिणाम करत आहे. बंगालच्या उपसागरातील उत्तरेकडील भागात समुद्राची पातळी वाढत आहे. इथं भारताच्या पूर्वोत्तर म्हणजे पश्चिम बंगाल ते तामिळनाडूपर्यंत भाग येतो. त्यात या भागात पाणी पातळी वाढल्यास दक्षिण चीनच्या भागांवर सर्वाधिक परिणाम होईल.6 / 10समुद्राच्या पाण्याची पातळी प्रत्येक ठिकाणी एकसारखी वाढत नाही. परंतु हिंद महासागराचं तापमान पूर्व आणि पश्चिमी दोन्ही किनाऱ्यांवर जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे. २०२४ मध्ये जागतिक सरासरी समुद्रातील पाणी पातळी वाढण्याचा स्तर ३.४ मिलिमीटर होता. भारताच्या पश्चिमी किनारपट्टीवर ही वाढ ३.९ ते ४.०० मिलिमीटर इतकी आहे.7 / 10WMO च्या स्टेट ऑफ द क्लायमेट इन आशिया २०२४ च्या रिपोर्टमध्ये आशियातील तापमान वाढ सरासरीपेक्षा दुपटीने वाढत असल्याचे बोलले गेले. त्यातून हवामान बदल होत आहे आणि त्यामुळे येथील प्रदेशाला नुकसान पोहण्याची शक्यता आहे. १९९१ ते २०२४ या कालावधीतील तापमान वाढ हे १९६१ ते १९९० च्या तुलनेने दुप्पट झाले आहे.8 / 10सातत्याने होणाऱ्या तापमान वाढीमुळे हिमालय आणि तियान पर्वतातील २४ पैकी २३ हिमपर्वतातील बर्फ वितळत आहे. त्यातून हिमनदीतील पाणी पातळीत वाढ होतेय आणि भूस्खलनासारख्या घटनाही घडत आहेत. 9 / 10या अहवालात २०२४ मध्ये भारतात आलेल्या एका मोठ्या नैसर्गिक आपत्तीचाही उल्लेख आहे. हवामान बदलामुळे केरळच्या वायनाड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आणि ३५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. ही घटना ३० जुलै रोजी घडली, जेव्हा ४८ तासांत ५०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला असं त्यात असे म्हटले आहे. 10 / 10त्याच वेळी २०२४ मध्ये तीव्र उष्णतेमुळे भारताच्या विविध भागात ४५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. याशिवाय, वीज पडून सुमारे १,३०० लोकांना आपला जीव गमवावा लागला. १० जुलै रोजी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि झारखंडमध्ये वीज पडून ७२ लोकांचा मृत्यू झाला.