माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 12:30 IST
1 / 12Pradhan Mantri Ujjwala Yojana 2.0: केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala Yojana 2.0) दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. या योजनेतून गरीबी रेषेखालील कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन (Free Gas Connection) दिले जाणार आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता. (free gas connection, cylinder: All you need to know about scheme)2 / 12या योजनेनुसार मोफत कनेक्शन देताना पहिला सिलिंडर मोफत आणि गॅस शेगडीदेखील मोफतच दिली जाणार आहे. 3 / 12महत्वाचे म्हणजे जे लोक भाड्याच्या घरात राहतात, तेथील पत्ता नाहीय, त्यांनादेखील Ujjwala Yojana 2.0 अंतर्गत गॅस कनेक्शन दिले जाणार आहे. यामुळे कामाचे ठिकाण बदलले किंवा घर बदलले तरी त्यांना कोणतीही समस्या येणार नाही.4 / 12या योजनेचा लाभ फक्त महिला घेऊ शकता. त्यांच्याकडे दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड हवे. 5 / 12अर्जदार महिलेचे वय हे १८ वर्षांपेक्षा जास्त हवे. एकाच घरात या योजनेचे दुसरे कनेक्शन नसावे. 6 / 12उज्ज्वला योजना 2.0 चा लाभ घेण्यासाठी eKYC असणे गरजेचे आहे. अर्जदार महिलेचे आधार कार्ड, ओळख पत्र चालेल. 7 / 12कोणत्याही राज्याचे गरीबी रेषेखालील रेशनकार्ड. यामध्ये असलेल्या कुटुंबातील सदस्यांचे आधार. बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी नंबर. 8 / 12अर्जदारांना pmuy.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.9 / 12ऑनलाइन पोर्टल pmuy.gov.in वरील वर दिलेल्या Apply For New Ujjwala 2.0 Connection वर क्लिक करावे. 10 / 12इथे तुम्हाला तीन पर्याय दिसतील इंडेन, भारत पेट्रोलियम आणि एचपी. तुमच्या पसंतीनुसार कंपनी निवडावी आणि अन्य आवश्यक माहिती भरावी. 11 / 12जर ऑनलाईन शक्य नसेल तर तुम्ही तो फॉर्म डाऊनलोड करून हाताने भरून जवळच्या गॅस एजन्सीकडे देता येईल. 12 / 12तुमचे सर्व कागदपत्र व्हेरिफाय झाल्यावर तुम्हाला सरकारकडून मोफत गॅस कनेक्शन दिले जाईल.