शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 11:13 IST

1 / 9
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यासाठी आलेल्या अमेरिकी सीआयए एजंटचा रशियाच्या मदतीने खात्मा करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. अशातच मोदींची कार, एसपीजी ताफ्यातील सर्वच कार या बिहारमधील रस्त्याशेजारच्या एका वॉशिंग सेंटरवर धुण्यासाठी नेण्यात आल्याचे समोर आले आहे.
2 / 9
वॉशिंग सेंटरच्या मालकाने या कार आपल्याकडे आल्याची रिल व्हायरल केली आणि पंतप्रधानांच्या सुरक्षा प्रोटोकॉलवर प्रश्नचिन्ह उभे राहू लागले आहे.
3 / 9
व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये काही मोठ्या आणि जॅमर असलेल्या गाड्या एका वॉश सेंटरवर उभ्या दिसत आहेत, ज्या पंतप्रधान मोदींच्या ताफ्यातील असल्याचा दावा केला जात आहे.
4 / 9
व्हायरल व्हिडिओत दिसणाऱ्या गाड्यांचा नंबर पूर्वी पंतप्रधान मोदी वापरत असलेल्या गाड्यांच्या क्रमांकाशी जुळत असल्याचे सांगितले जात आहे. या व्हायरल दाव्यांमध्ये नेमके किती तथ्य आहे, याची कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
5 / 9
पंतप्रधानांच्या सुरक्षा कारणांमुळे त्यांच्या वाहनांच्या देखभालीच्या प्रोटोकॉलची माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नसते. परंतु, विविध सुरक्षा अहवालानुसार, पंतप्रधानांच्या वाहनांचे रखरखाव आणि सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी विशेष सुरक्षा गट (SPG) या संस्थेकडे असते.
6 / 9
एसपीजी ही पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी तयार केलेली देशातील सर्वात प्रशिक्षित आणि अत्याधुनिक सुरक्षा एजन्सी आहे. परंतू, या कारकडे एकही एसपीजी लक्ष ठेवून असल्याचे दिसलेले नाही.
7 / 9
ब्लू बुकातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पंतप्रधानांच्या बुलेटप्रूफ आणि अत्याधुनीक सुरक्षा सुविधांनी सज्ज असलेल्या वाहनांची दुरुस्ती आणि देखरेख केवळ उच्च प्रशिक्षित आणि सुरक्षा तपासणी झालेल्या तज्ञांच्या देखरेखीखाली आणि गुप्त ठिकाणी केली जाते.
8 / 9
बाहेरील किंवा सामान्य गॅरेजमध्ये ही वाहने नेणे, तसेच वाहनांच्या स्पेअर पार्ट्स किंवा दुरुस्तीचा कोणताही रेकॉर्ड उघड करणे, सुरक्षा प्रोटोकॉलचे गंभीर उल्लंघन मानले जाते.
9 / 9
या पार्श्वभूमीवर, कथित व्हायरल व्हिडिओत झालेला प्रकार, सुरक्षा नियमांचे मोठे उल्लंघन दर्शवणारा आहे. सुरक्षा एजन्सीकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता आहे.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान