शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 09:14 IST

1 / 9
ब्रिटिशांचे एफ-35बी हे लढाऊ विमान गेल्या महिन्यात केरळमध्ये आपत्कालीन परिस्थितीमुळे उतरवावे लागले होते. इंधन भरून पुन्हा उड्डाण करणार एवढ्यात त्याच्या हायड्रॉलिक सिस्टीममध्ये बिघाड झाला होता. यानंतर जवळपास ३७ दिवसांनी हे विमान मंगळवारी ब्रिटनला रवाना झाले. भारतावरही २००४ मध्ये अशीच वेळ आली होती, तेव्हा २२ दिवस लढाऊ विमान परदेशी विमानतळावर होते.
2 / 9
शांती सेनेच्या एअर शोसाठी गेलेले मिराज २००० हे लढाऊ विमान मॉरिशसच्या विमानतळावर उतरताना दुर्घटनाग्रस्त झाले होते. यामुळे ते २२ दिवस तिथेच अडकले होते. एफ-३५ लढाऊ विमान परत नेण्यासाठी ब्रिटनने जे केले तेच तेव्हा भारताने आपले लढाऊ विमान आणण्यासाठी केले होते.
3 / 9
भारतावर ही अशाप्रकारची पहिलीच वेळ होती. हे विमान परत आणताना हवाई दलाच्या पायलटने मोठी रिस्क घेतली होती. अखेर दोनवेळा इंधन भरून मिराज-२००० हे लढाऊ विमान परत मायदेशी आणण्याचा प्लॅन यशस्वी ठरला होता. चला नेमके काय घडले होते ते पाहुया...
4 / 9
मिराज-२००० हे लढाऊ विमान आताच्या राफेल बनविणाऱ्या दसॉल्ट कंपनीनेच बनविलेले होते. हे विमान एअर शोमध्ये भाग घेण्यासाठी गेले होते. उतरताना या विमानाच्या लँडिंग गिअरला समस्या आली. तेव्हा हे विमान विना लँडिंग गिअर उतरवण्याची सुविधा नव्हती. यामुळे इंजिनाच्या पाठीमागील सहायक इंधन टाकी, एअरफ्रेम आणि एवियोनिक्स व कॉकपिट इंस्ट्रूमेंटेशनला मोठे नुकसान झाले होते.
5 / 9
या लढाऊ विमानाला परत दुरुस्त करण्यासाठी आणि भारतात आणण्यासाठी भारतीय हवाई दलाने एक कधीही न घेतलेला निर्णय घेतला होता. भारतातून दोन विमाने मॉरीशसच्या दिशेने उडाली होती. एका विमानात इंजिनिअर, मिराजला आणण्यासाठी धाडस दाखविणारा पायलट व विमानाचे दुर्घटनाग्रस्त झालेले पार्ट आणि दुसरे विमान हे हवेत लढाऊ विमानांना पुरविणारे इंधन असलेले होते.
6 / 9
हवाई दलाच्या इंजिनिअरनी पहिल्या १० दिवसांतच लढाऊ विमान दुरुस्त केले होते. या विमानाची उड्डाणाची चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी ठरली. यानंतर इतर दुरुस्ती करण्यात आली. २२ दिवसांनी हे मिराज लढाऊ विमान भारताकडे येण्यासाठी झेपावणार होते. एकतर विमान अपघातग्रस्त होते, प्रवास मोठा होता आणि हवाई दलाने जो रूट निवडला होता तो बहुतांश निर्मनुष्य होता.
7 / 9
२६ ऑक्टोबरला तो आव्हानात्मक दिवस उजाडला. हिंदी महासागरावरून पाच तास या विमानाला उड्डाण करायचे होते. काही बिघाड झालाच असता तर विमान कोसळणे निश्चित होते. लढाऊ विमान हवाई दलाची दोन विमाने. लढाऊ विमान असल्याने त्याचा वेग या दोन विमानांना गाठणे शक्य नव्हते. मॉरीशसहून उड्डाण करताना आधी इंधन टँक असलेले विमान हवेत झेपावले, कारण लढाऊ विमानात जास्त इंधन न ठेवता त्याला उड्डाण करायचे होते.
8 / 9
मिराजने उड्डाण करून ते हवेत स्थिरावताच पहिल्यांदा इंधन भरण्यात आले. यानंतर मिराजने २५ हजार फुटांची उंची गाठली. आता या इंधन टँकर विमानाला मिराजला पुढच्या टप्प्यात गाठायचे होते. कारण एका टँकमध्ये मिराज भारतात येऊ शकणार नव्हते. मिराजच्या पायलटवरच नाही तर हवाई दलाच्या टँकर विमानाच्या पायलटसमोरही मोठे आव्हान होते, मिराजला गाठायचे.
9 / 9
तिन्ही विमाने एकमेकांशी संपर्क ठेवत उड्डाण करत होती, हवामान खराब होते, अशा परिस्थितीत हवेत तीनवेळा मिराजमध्ये इंधन भरण्यात आले आणि योगायोग म्हणजे ज्या विमानतळावर ब्रिटिशांच्या स्टील्थ फाय़टर एफ-35बी ने लँडिंग केले होते, त्याच तिरुवनंतपुरमच्या विमानतळावर मिराजने देखील यशस्वी प्रवास करत लँडिंग केले होते.
टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलEnglandइंग्लंडKeralaकेरळfighter jetलढाऊ विमान