1 / 12चीनमधून पसरलेल्या कोरोनामुळे जगासमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. चीन या संकटातून बाहेर आला असला तरी इतर अनेक देश अजूनही कोरोनाशी दोन हात करत आहेत.2 / 12चीननं कोरोना पसरवला, असा आरोप अनेक देशांनी केला आहे. त्यामुळे चीनच्या सामानावर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. भारतातही ही मागणी जोर धरू लागली आहे.3 / 12चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केलं. या आवाहनाला अनेकजण सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. 4 / 12आपण सकाळपासून रात्रीपर्यंत दिवसभर चिनी वस्तूंचा वापर करतो. घरी, ऑफिसमध्ये सगळीकडे वापरत असलेल्या बहुतांश वस्तू चीनमध्ये तयार होतात.5 / 12सकाळी आपण दात घासतो. त्यासाठी वापरली टूथब्रश वापरतो. टूथब्रशचा ब्रँड जरी भारतीय असला, तरी त्याचं उत्पादन चीनमध्ये झालेलं असतं. टूथपेस्टचंही तेच. अनेक कंपन्या टूथपेस्टसाठी वापरली जाणारी पावडर चीनमधूनच मागवतात.6 / 12बाथरूममधील बऱ्याचशा प्लास्टिकच्या वस्तू चीनमध्येच तयार होतात. शॅम्पूपासून साबणापर्यंतचा कच्चा माल चीनमधूनच येतो.7 / 12किचनमध्ये वापरली जाणारी मेलामाईनची भांडी आणि इतर वस्तू चीनमधूनच मागवल्या जातात. बरेचसे व्यापारी या वस्तूंवर भारतीय ब्रँड्सचा शिक्का मारतात. 8 / 12ऑफिसमध्ये वापरले जाणारे बरेचसे लॅपटॉप, डेस्कटॉप चीनमध्येच तयार होतात. प्रिंटरसह वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ऍक्सेसरीजची निर्मितीदेखील चीनमध्येच होते.9 / 12आपण दिवसभर स्मार्टफोन्सचा वापर करतो. भारतीय बाजारात सर्वाधिक विकले जाणारे स्मार्टफोन्स चिनी कंपन्यांचे आहेत. 10 / 12रात्री झोपण्याआधी अनेक जण टीव्ही पाहतात. भारतातील ९० टक्के एलसीडी, एलईडी, स्मार्ट टीव्हीच्या किट चीनमधूनच येतात.11 / 12भारतीय सणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूदेखील चीनमधूनच येतात. दिवाळीतील लक्ष्मी गणेशाच्या मूर्ती, दिव्यांची तोरणं चीनमध्येच तयार होतात. होळीच्या पिचकाऱ्या, रंगदेखील चीनमध्येच तयार होतात.12 / 12गेल्या दोन दशकांमध्ये भारतातील अनेक कारखाने बंद झाले. त्यानंतर भारतीय व्यापाऱ्यांनी चीनमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंचा पर्याय निवडला. या वस्तू स्वस्तात उपलब्ध असल्यानं व्यापाऱ्यांना फायदा होऊ लागला.