1 / 13ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध दुसरी कसोटीही चार गडी राखून जिंकली आहे. कांगारूंनी भारताचा चार गडी राखून पराभव करत मालिकेमध्ये वरचश्मा राखला आहे.2 / 13मराठा व मुस्लीम आरक्षणाला स्थगिती देण्याचा मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवत महाराष्ट्र सरकारला धक्का दिला आहे.3 / 13भाजपाचे पाठिराखे रामजादे व विरोधक हरामजादे असं बेलगाम वक्तव्य करणा-या भाजपाच्या खासदार साध्वी निरंजन ज्योती यांनी अखेर माफी मागितली.4 / 13मरीन ड्राइव्हच्या समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे १९०० कोटी रुपयांचे भव्य स्मारक उभारण्यास पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे.5 / 13२७ वर्षांच्या प्रवासी महिलेवर उबेर कंपनीच्या ड्रायव्हरने दिल्लीत बलात्कार केल्याच्या घटनेने खळबळ. बलात्कारी ड्रायव्हर शिवकुमार यादववर याआधीही बलात्काराचा आरोप असून त्याला पोलीसांनी अटक केली.6 / 13धर्मांतराच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्टेटमेंट द्यायला हवं अशी आग्रही मागणी करत विरोधकांनी राज्यसभेचे कामकाज होऊ दिले नाही.7 / 13आग्रा येथे धर्म जागरण मंचाने २०० गरीब मुस्लीमांना घरवापसी कार्यक्रमांतर्गत हिंदू धर्मात आणल्याच्या घटनेने खळबळ. हे धर्मांतर स्वेच्छेने झाले की जबरदस्तीने व लालूच दाखवून यावरून पेटले रणकंदन8 / 13ISIS चे समर्थन करणारे व इराक व सीरियातल्या घडामोडींची माहिती देणारे @shamiwtness या ट्विटरहँडलचा यूजर मेहदी मसरूर बिस्वास याला बेंगळूर पोलीसांनी अटक केली. इंग्लंडच्या चॅनेल ४ ने मेहदी बेंगळूरमधून हे ट्विटर हँडल चालवत असल्याची बातमी ब्रेक केली होती.9 / 13सिडनीतील एका कॅफेमधल्या सुमारे ४० जणांना बंदुकीच्या धाकावर हारून मोनीस या माथेफिरूने ओलीस ठेवले आणि ISISच्या विचारसरणीचा धोका जगभर पसरल्याचे दिसून आले. कॅफेमध्ये ISISचा फ्लॅग मागवण्याची व पंतप्रधानांशी बोलण्याची मागणी करणा-या मोनिसला ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षा दलाने कंठस्नान घातले. दोन नागरिकांना या घटनेत प्राण गमवावे लागले.10 / 13पाकिस्तानमधील पेशावर येथील एका लष्करी शाळेवर पाकिस्तान तालिबानच्या ६ दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला. या हल्ल्यात १३२ निष्पाप विद्यार्थी ठार झाले. दहशतवाद्यांचे आत्तापर्यंतच्या या सगळ्यात नृशंस व भ्याड हल्ल्यामुळे जग हादरले.11 / 13भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि हिंदू महासभेचे नेते व बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय (मरणोत्तर) यांना 12 / 13२८ डिसेंबर रोजी एअर एशियाचे इंडोनेशियाहून सिंगापूरला जाणारे क्यूझेड ८५०१ हे विमान जावा बेटाजवळील समुद्रात कोसळले. या विमानात १५५ प्रवासी आणि ७ कर्मचारी असे १६२ जण होते. यापैकी ४६ जणांचे मृतदेह सापडले असून अजूनही शोधमोहीम सुरु आहे. 13 / 13भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ३० डिसेंबररोजी तडकाफडकी कसोटीतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया दौ-यात कसोटी मालिका गमावल्यावर धोनीने हा निर्णय घेतला असून आता तो फक्त वन डे व टी- २० सामन्यांमध्येच खेळणार आहे.