By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 09:06 IST
1 / 9देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज ४ लाख कोरोना रुग्ण आढळून येत होते. आता हाच आकडा ४० हजारांच्या खाली आला आहे.2 / 9गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट होत आहे. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. हा धोका टाळण्यासाठी लसीकरण मोहिमेला वेग देण्याची गरज आहे.3 / 9कोरोना लसीकरण मोहिमेत भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि सीरमच्या कोविशील्डचा सर्वाधिक वापर होत आहे. सीरमची उत्पादन क्षमता खूप मोठी असल्यानं बहुतांश नागरिकांना कोविशील्ड लस मिळाली आहे. त्यातच आता कोविशील्ड लसीबद्दल एक दिलासादायक माहिती सरकारनं दिली आहे. 4 / 9कोविशील्ड लस कोरोना महामारीविरोधात ९३ टक्के सुरक्षा देते आणि यामुळे मृत्यूदर ९८ टक्क्यांनी घटतो अशी माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याचं आवाहन त्यांनी केलं.5 / 9कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली होती, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं. याबद्दल सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयानं (एएफएमसी) अहवाल तयार केल्याची माहिती पॉल यांनी दिली. 6 / 9कोरोनाविरुद्धच्या लढाईत अग्रस्थानी राहून लढणारे १५ लाख डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्या आरोग्याचा अभ्यास करून एएफएमसीनं अहवाल तयार केला. कोविशील्डची लस घेतलेल्या ९३ टक्के लोकांना दुसऱ्या लाटेत विषाणूपासून संरक्षण मिळालं, असं हा अहवाल सांगतो. 7 / 9कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर संक्रमणाचा धोका कमी होतो. मात्र याची संपूर्ण खात्री देता येत नाही. दुसरी लाट आली असताना कोविशील्डमुळे मृत्यूदर ९८ टक्क्यांनी कमी झाला, असंदेखील एएफएमसीच्या अहवासाल नमूद करण्यात आलं आहे.8 / 9कोरोनाची लागण होणारच नाही अशी खात्री कोणतीच लस घेतल्यानंतर देता येत नाही. मात्र लस घेतल्यामुळे गंभीर परिस्थिती टाळता येते, असं व्ही. के. पॉल यांनी सांगितलं.9 / 9आपल्याकडे असलेल्या लसींवर विश्वास ठेवा. लसीकरण करून घ्या आणि लस घेतल्यावर सतर्क राहा. बेजबाबदारपणे वागू नका, असं आवाहन पॉल यांनी नागरिकांना केलं.