Omicron Variant : टेन्शन वाढलं! 'वेगाने पसरतोय ओमायक्रॉन; कोरोनामुक्त झालेल्यांना, लस घेतलेल्यांना होतोय संसर्ग' By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 10:25 AM1 / 152 / 15कोरोनाने संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं आहे. कोरोनामुळे काही देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच रुग्णसंख्या वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे रुग्णांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.3 / 15कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना सुरू असताना जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. ओमायक्रॉन बहुतेक देशांमध्ये पोहोचला आहे आणि तो अभूतपूर्व वेगाने पसरत आहे असं म्हटलं आहे.4 / 15कोरोना लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना किंवा यापूर्वी कोरोना होऊन गेलेल्या लोकांनाही ओमायक्रॉनचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आता समोर आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.5 / 15डब्ल्यूएओचे महानिर्देशक ट्रेडोस अधनोम घेब्रेसिस यांनी जगातील सध्याच्या कोरोना परिस्थितीसंदर्भात सविस्तर माहिती दिली. आता समोर आलेल्या पुराव्यांनुसार कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टाच्या तुलनेत फारच वेगाने पसरत असल्याचं म्हटलं आहे.6 / 15ट्रेडोस यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे सर्व डोस घेतलेल्यांना किंवा यापूर्वी कोरोनावर मात केलेल्यांमध्येही या नवीन विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. WHO ने दिलेल्या माहितीनुसार जगामधील 89 देशांमध्ये कोरोनाच्या या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. 7 / 15कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका असणाऱ्या भागांमध्ये रुग्णसंख्या दीड ते तीन दिवसांमध्ये दुप्पटीने वाढत आहे. अधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये मोठ्याप्रमाणात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.8 / 15WHO च्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी सुरुवातीच्या काही पुराव्यावरून ओमायक्रॉन हा इतर व्हेरिएंटच्या तुलनेत कमी धोकादायक आहे असं म्हणणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे.9 / 15जागतिक पातळीवर ओमायक्रॉन व्हेरिएंट ज्या वेगाने पसरतोय, ते पाहाता त्याचा एकूणच कोरोनाच्या साथीबाबत मोठा परिणाम जाणवू शकतो हे दिसून येत आहे. जर ओमायक्रॉनला रोखायचं असेल, तर आणखी रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याआधी पावलं उचलायला हवीत. हीच योग्य वेळ आहे असं टेड्रॉस यांनी म्हटलं आहे.10 / 15ओमायक्रॉनचं जागितक पातळीवर वेगाने पसरणं किंवा 30 हून अधिक संख्येने असणारे म्युटेशन या गोष्टी हेच दर्शवत आहेत की त्याचा कोरोना साथीचा मोठा परिणाम होऊ शकतो. पण तो परिणाम नेमका काय असेल, हे मात्र आत्ता सांगता येणं कठीण आहे असं टेड्रॉस यांनी स्पष्ट केलं आहे.11 / 15नवा व्हेरिएंट जीवघेणा नसल्याचं अनेक संशोधकांचं मत आहे. मात्र, याबाबत डॉ. टेड्रॉस यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. या व्हेरिएंटमुळे मृत्यू होण्याची शक्यता जरी कमी असली, तरी अनेकांना यातून दीर्घकालीन समस्यांचा सामना करावा लागू शकतो.12 / 15कोरोनाचा दीर्घकाळ सामना करणं किंवा कोरोनातून बरे झाल्यानंतर येणाऱ्या आजारांचा सामना करणं अशा गोष्टी घडू शकतात. आत्ता कुठे आम्हाला ओमायक्रॉनची काही लक्षणं समजू लागली आहेत असं देखील म्हटलं आहे.13 / 15'जगातील सर्व देशांनी यावर तातडीने पावलं उचलणं आवश्यक आहे. आज आणि येणाऱ्या काही दिवसांत जगभरातील देश जी पावलं उचलतील, त्यावरच ओमायक्रॉन व्हेरिएंट कशा पद्धतीने वाढेल, हे अवलंबून असेल.'14 / 15जर इतर देश त्यांच्या रुग्णालयांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण दाखल होण्याची वाट पाहू लागले, तर फार उशीर होईल. अजिबात वाट पाहू नका, आत्ता पावलं उचला अशा शब्दांत टेड्रॉस यांनी इशारा दिला आहे.15 / 15'आम्ही सर्व देशांना आवाहन करतो की त्यांनी सतर्क राहून तपासणी आणि जेनोम सिक्वेन्सिंगची संख्या वाढवायला हवी. यामध्ये आता कोणताही गोंधळ झाला, तर त्यात अजून जीव जातील' असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications