By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 17:07 IST
1 / 9देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरण अभियानाला वेग देण्याची गरज आहे. 2 / 9कोरोना लसीकरण अभियान राबवत असताना काही नियम घालून देण्यात आले आहेत. लसीकरण मोहीम राबवताना कोरोना लसा वाया जाऊ देऊ नका, अशा सूचना केंद्राकडून देण्यात आल्या. एका कुपीतून जास्ती जास्त डोस द्या, अशा सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत.3 / 9कोरोना लसींचे डोस वाया घालवू नका, अधिकाधिक डोस द्या, अशा सूचना केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात आल्या. कोरोना लसीच्या एका कुपीतून साधारणत: १० डोस देता येतात. मात्र काही राज्यांमधील लसीकरण केंद्रांवर १२ डोस दिले जात आहेत.4 / 9हरयाणा, चंदिगढ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश यांच्यासह बऱ्याच राज्यांनी केलेल्या दाव्यांबद्दल डॉक्टरांनी आणि लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी चिंता व्यक्त केली आहे. 5 / 9केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार ४१ लाख अतिरिक्त डोस देण्यात आले आहेत. हा आकडा धक्कादायक असल्याचं तज्ज्ञ आणि लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी सांगितलं.6 / 9देशभरात ४१ लाख ११ हजार ५१६ अतिरिक्त डोस देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं राज्यसभेत दिली. तमिळनाडूत सर्वाधिक ५ लाख ८८ हजार २४३ अतिरिक्त डोस देण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये हाच आकडा ४ लाख ८७ हजार, तर गुजरातमध्ये ४ लाख ६२ हजार आहे. 7 / 9सीरम निर्मिती कोविशील्ड लसीच्या एका कुपीतून १२ डोस दिले जात असल्याचा दावा हरयाणा, चंदिगढ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश यांच्यासह बऱ्याच राज्यांनी केला आहे.8 / 9एका कुपीतून अतिरिक्त डोस काढण्याचं उद्दिष्ट देणं पूर्णपणे चुकीचं असल्याचं दिल्लीच्या आरोग्य विभागाचे माजी अधिकारी महेंद्र प्रताप यांनी सांगितलं. उत्तम प्रशिक्षण आणि सतर्कतेमुळे जास्तीत जास्त एक अतिरिक्त डोस कुपीतून काढता येऊ शकतो, असं प्रताप म्हणाले.9 / 9कुपीतून अतिरिक्त डोस काढण्याचा एकही प्रकार दिल्लीत घडलेला नाही. दिल्लीत आतापर्यंत १९ हजार ९८९ डोस वाया गेले आहेत.