Budget 2021: बजेटमुळे कोण आनंदी अन् कोणाची उडाली दांडी? जाणून घ्या एका क्लिकवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 17:33 IST
1 / 10अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना संकट, लॉकडाऊनमुळे घटलेला महसूल अशा परिस्थितीत सरकारचं उत्पन्न वाढवण्याचं आव्हान सीतारामन यांच्यासमोर होतं.2 / 10कोरोना संकटातून सावरणाऱ्या अर्थव्यवस्थेला सीतारामन कसा दिलासा देणार याकडे लक्ष लागलं होतं. महसूल वाढवताना कोरोनाची आर्थिक झळ सोसणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं दुहेरी आव्हान त्यांच्यापुढे होतं.3 / 10यंदाच्या अर्थसंकल्पातून कोण आनंदी आणि कोण दु:खी याचा विचार करायचा झाल्यास काही प्रमुख क्षेत्रांना मदतीचा हात मिळाला आहे. मात्र मध्यमवर्गीय, नोकरदारांना धक्का बसला आहे.4 / 10यंदाच्या अर्थसंकल्पाचा सर्वाधिक फायदा आरोग्य क्षेत्राला होईल. अर्थमंत्र्यांनी २.३८ लाख कोटी रुपयांची घोषणा केली आहे. याआधीच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी ९४ हजार कोटींची तरतूद होती. आता त्यात थेट १३५ टक्क्यांची वाढ झाली आहे.5 / 10अर्थसंकल्पातून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ७५ वर्षे ओलांडलेल्यांना आता कोणताही कर भरावा लागणार नाही. त्यांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनावर कोणताही कर आकारला जाणार नाही.6 / 10अर्थसंकल्पातून विमा क्षेत्रात ७४ टक्के थेट परकीय गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली आहे. आधी ही मर्यादा ४९ टक्के होती. 7 / 10बँकांची बुडित खात्यात गेलेली कर्ज वसूल करण्यासाठी एक वेगळी कंपनी तयार केली जाईल. यामुळे बँकिंग क्षेत्राला दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.8 / 10यंदाच्या अर्थसंकल्पातून नोकरदारांच्या हाती फारसं काहीच लागलेलं नाही. ८० सीच्या अंतर्गत कर सीमा वाढवली जाण्याची अपेक्षा होती. करमुक्त उत्पन्नाची सीमा वाढवली जाईल, असा अंदाज होता. मात्र यातलं काहीच झालं नाही.9 / 10यंदाच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काहीच मिळालेलं नाही. उलट अनेक वस्तूंवर कस्टम ड्युटी आणि सरचार्ज लावण्यात आल्यानं मोबाईलसह अन्य उत्पादनं महागणार आहेत. 10 / 10महिलांसाठी काही विशेष घोषणा होतील अशी अपेक्षा होती. मात्र तीदेखील फोल ठरली. अर्थसंकल्पात महिलांना पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं आहे.