शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

देशातील 4 दिग्गजांचा जन्मदिवस, क्रीडा, सिनेमा अन् राजकारणातील 'थलैवा'

By महेश गलांडे | Published: December 12, 2020 8:34 AM

1 / 12
देशातील 3 वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींचा आज बर्थ डे आहे, तर भाजपा नेते गोपीनाथ मुंडेंची जयंत. त्यांचाही जन्म 12 डिसेंबर रोजीचा आहे.
2 / 12
भारतीय संघात अष्टपैलून कामगिरी करुन कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर युवराजसिंगने अधिराज्य गाजवलंय, युवीचा आज 40 वा बर्थ डे साजरा होत आहे.
3 / 12
युवराजने आपल्या चाहत्यांना पत्राद्वारे वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन केलंय. सोशल मीडियातून युवराजवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
4 / 12
सुपरस्टार रजनिकांत यांचाही आज बर्थ डे आहे, तमिळ सिनेसृष्टीचा थैलवा म्हणून रजनीकांत यांना सन्मान दिला जातो. दाक्षिणात्या सिनेसृष्टीचा महानायक असलेल्या रजनीकांत यांनाही सोशल मीडियातून शुभेच्छा देण्यात येत आहे.
5 / 12
हिंदी आणि तमिळ चित्रपटातून अनेक दशके रजनीकांत यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलंय. रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 साली झाला आहे
6 / 12
रजनीकांत हे राजकारणात येण्याची चर्चा असून ते आपला स्वतंत्र पक्ष स्थापन करणार आहेत, एक संवेदनशील अभिनेता नेता बनण्याच्या मार्गावर आहे
7 / 12
राज्याच्या राजकारणाचे भिष्म पितामह म्हणून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांच्याकडे पाहिलं आहे. शरद पवार यांचाही आज बर्थ डे.
8 / 12
राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीची पेरणी करुन महाराष्ट्रात वेगळच राजकीय समीकरण शरद पवार यांनी निर्माण केलंय
9 / 12
80 वर्षाचा तरुण म्हणून शरद पवार यांच्या कार्याची आज सोशल मीडियातून मोठी चर्चा होत आहे. त्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडण्याचं काम करत त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
10 / 12
भाजपाचे दिवंगत नेते आणि बहुजन समाजातून मंत्रीपदापर्यंतचा प्रवास करणारा सामान्य कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या गोपीनाथ मुंडेंचाही आज जन्मदिवस, जून 2016 मध्ये गोपीनाथ मुंडे यांचं दुर्दैवी अपघाती निधन झालं
11 / 12
सावरगाव येथील गोपीनाथ गडावर आज गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे.
12 / 12
गोपीनाथ मुंडेंचे अनुयायी आणि कार्यकर्ते गोपीनाथ गडावर जाऊन माथा टेकून साहेबांना अभिवादन करतात, पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटरवरुन गोपीनाथ गडाचे फोटो शेअर केले आहेत.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारYuvraj Singhयुवराज सिंगGopinath Mundeगोपीनाथ मुंडे