1 / 7राज्यात ठिकठिकाणी गुरुवारी गणरायाला वाजतगाजत निरोप देण्यात आला. (सर्व फोटो - सुशील कदम) 2 / 7गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशा भावपूर्ण घोषणात ढोल- ताशांच्या गजरात संपुर्ण महाराष्ट्रातील गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. 3 / 7मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणपती बाप्पा मोरया... पुढल्यावर्षी लवकर या....अशा जयघोषात एक महाकाय गणेशमूर्ती विसर्जित केली जात असताना.4 / 7गिरगाव चौपाटीचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. गुलाल उधळत ढोल-ताशांच्या गजरात लालबाग ते गिरगाव चौपाटीपर्यंत निघालेली मिरवणूक.5 / 7मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाला गुरुवारी भावपूर्ण निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. 6 / 7कित्येक आठवडे दडी मारलेल्या वरुणराजानेदेखील लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी हजेरी लावली. जवळपास महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर हा पाऊस झाल्याने जणू बाप्पाच पावल्याचा आनंद बळीराजाला झाला7 / 7गेल्या दहा दिवसांपासून गणेश भक्तांना सकारात्मक उर्जा व आनंद देणाऱ्या गणरायाला निरोप देतांना गणेशभक्त हळवे झाले असले तरी त्यांच्या जल्लोषाला उधाण आले होते.