1 / 5देवी अंबाबाई सेवा मंडळामार्फत सहाव्या माळेला शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त पन्हाळा येथील अंबाबाईच्या मूर्तीची मंगळवारी बैठी पूजा रविवारी करवीरनिवासिनीच्या रूपात महेश जगदाळे, पृथ्वीराज भोसले,अमृत चरणकर यांनी बांधली. देवी अंबाबाई सेवा मंडळामार्फत पन्हाळा येथील अंबाबाई मंदिरात सकाळी अभिषेक, सायंकाळी महिला मंडळामार्फत भजन, जोगवा असे विविध कार्यक्रम रोज होत आहेत. नीळकंठ मोघे यांनी पौराहित्य केले. पन्हाळा येथील कर्तव्य फाउंडेशनमार्फत फुलांची आरास मांडली होती. 2 / 5शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या माळेला (मंगळवारी) कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची श्रृंगेरी शारदाम्बा रूपात पूजा बांधण्यात आली. जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवीची दीपपूजा बांधण्यात आली. 3 / 5करवीर नवदुर्गा द्वितीय अवतार श्री मुक्तांबिका देवीची मंगळवारी नवरात्रीच्या षष्ठीला कमलासना गजलक्ष्मी रुपातील पुजा बांधण्यात आली आहे. ही पुजा वैभव माने यांनी बांधली.4 / 5शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मंगळवारी यमाई देवी (जोतिबा डोंगर) कमळपुष्पातील सालंकृत आकर्षक महापूजा बांधण्यात आली होती.5 / 5शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मंगळवारी श्री जोतिबाची (जोतिबा डोंगर) कमळपुष्पातील सालंकृत आकर्षक महापूजा बांधण्यात आली होती.