शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! रिसेप्शन पार्टीतच नवरदेवाने घेतला नव्या नवरीचा जीव, कारण वाचून व्हाल हैराण....

By अमित इंगोले | Updated: October 6, 2020 17:22 IST

1 / 8
गुन्हेगारांची विचार करण्याची पद्धत सामान्य लोकांप्रमाणे नसते. ते त्यांच्या विचारांप्रमाणे गुन्हे करतात. त्यांच्यासाठी त्यांचा संशयच सत्य बनतो आणि या आधारावर ते गुन्हा करून बसतात. रशियात एका व्यक्तीने जो आधीच एका हत्येचा आरोपी होता. त्याचं एका महिलेवर प्रेम जडलं. महिलेला त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची कल्पना होती. पण तिला असं वाटलं की, तिच्या प्रेमाने तो चांगल्या मार्गावर येईल. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण रिसेप्शनच्या दिवशीच त्याने त्याच्या पत्नीची हत्या केली. कारण काय तर नवरी स्टेजवर त्याच्या मित्रांसोबत हसली. या व्यक्तीला हे आवडलं नाही आणि त्याने तिचा जीव घेतला.
2 / 8
dailymail.co.uk ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना रशियातील आहे. इथे एका व्यक्तीने त्याच्या नव्या नवरीला जीवाने मारलं. पार्टीमध्ये लोक मद्यसेवन करत होते आणि असेही सांगितले जात आहे की, नवरदेवानेही दारू प्यायली होती.
3 / 8
गुन्हेगाराची ओळख ३३ वर्षीय स्टीफन डॉल्जीख अशी पटली आहे. त्याच्यावर त्याची ३६ वर्षीय पत्नी ओक्साना पॉलुदेन्त्सेवाची हत्या करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगितले जाते की, त्याने लग्नाच्या दिवशीच पत्नीची हत्या केली.
4 / 8
ओक्साना आणि स्टीफनची भेट तो तुरूंगात असताना झाली होती. ओक्सानाने तरी स्टीफनसोबतचं नात पुढे नेलं. तिला असं वाटलं होतं की, प्रेमाने स्टीफनमध्ये बदल घडेल.
5 / 8
तुरूंगातच दोघांचं नातं फुललं आणि दोघे प्रेमात पडले. स्टीफन जसा बाहेर आला दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. आपल्या नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या उपस्थितीत त्यांचं लग्न झालं.
6 / 8
त्यानंतर रात्री पार्टी सुरू असताना स्टीफनने मित्र नव्या नवरीसोबत गंमत करत होते, हसत होते. ओक्साना सुद्धा त्यांच्यासोबत हसून बोलत होती. पण तिला हे कुठे माहीत की, यामुळे तिचं जीव जाणार होता.
7 / 8
स्टीफनने पत्नीला मित्रांसोबत हसताना पाहिले आणि तो संतापला. त्याने तिथेच स्टेजवर जाऊन तिला निर्दयीपणे मारायला सुरूवात केली. या घटनेच्या साक्षीदाराने सांगितले की, त्याने पत्नीला केस धरून ओढत नेलं आणि रस्त्यावर नेऊन मारलं. त्याने तिला लाथा-बुक्क्यांनी मारले. तो तोपर्यंत मारत राहिला जोपर्यंत तिचा जीव गेला नाही.
8 / 8
नंतर या घटनेबाबत पोलिसांना समजलं आणि त्यांनी स्टीफनला अटक केली. स्टीफनने कबूल केलं आहे की, पत्नीला मित्रांसोबत हसताना पाहून त्याला राग आला होता.
टॅग्स :russiaरशियाMurderखून