शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पेशावर: विद्यार्थ्यांवर तालिबानी हल्ला

By admin | Updated: December 16, 2014 00:00 IST

1 / 12
पाकिस्तानमधील पेशावर येथील एका लष्करी शाळेवर ६ ते ७ दहशतवाद्यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात १६० निष्पाप विद्यार्थी ठार झाले आहेत. पाकिस्तानमध्ये तालिबान्यांनी केलेल्या या हल्याची जगभरातून निंदा करण्यात येत आहे.
2 / 12
तालिबान्यांनी पेशावरमधील लष्करी शाळाला टार्गेट केल्याची माहिती मिळताच पाकिस्तानी सैनिकांनी विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी धाव घेतली. शाळेच्या परिसरात सैनिकांनी तालिबान्यांच्या दिशेने गोळीबार केला.
3 / 12
या हल्ल्याची जबाबदारी
4 / 12
दहशतवादी तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी विद्यार्थ्यांवर पेशावरमधील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.
5 / 12
तालिबान्यांनी ओलिस ठेवलेल्या असंख्य विद्यार्थ्यांची पाकिस्तान सैनिकांनी सुखरुप सुटका केली. विद्यार्थ्यांची सुटका होताच त्यांनी आपल्या घराकडे धाव घेतली.
6 / 12
तालिबान्यांचा मुकाबला करण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांच्या अतिरिक्त तुकड्या मागविण्यात आल्या. याच सैनिकांनी हल्ला केलेल्या ६-७ दहशतवादी तालिबान्यांचा खात्मा केला.
7 / 12
पेशावरमधील तालिबान्यांनी केलेला हा दहशतवादी हल्ला चिमुकल्या विद्यार्थ्यावर केलेला सर्वात मोठा हल्ला असून चिमुकल्यांचा जीव वाचविण्यासाठी पेशावरमध्ये असंख्य अ‍ॅम्यूलन्स रस्त्यावर धावाताना एकसारख्या दिसून आल्या.
8 / 12
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात धिक्कार केला असून पाकिस्तानमध्ये तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.
9 / 12
पाकिस्तानच्या पेशावरमध्ये तालिबान्यांनी केलेल्या हल्याचा तीव्र शब्दांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धिक्कार केला असून तालिबान्यांनी केलेला हा भ्याड हल्ला असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
10 / 12
शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेले कैलास सत्यार्थी व मलाला युसूफझाई या दोघांनी या हल्ल्याचा निषेध केला. तालिबानी हल्ल्याची घटना ह्रदय पिळवटून टाकणारी संवेदनाहिन आणि क्रूर असल्याचे मलालाने म्हटले तर पेशावरमधील हल्ला हा मानवतेसाठी काळा दिवस असल्याचे कैलाश सत्यार्थी यांनी म्हटले आहे.
11 / 12
सकाळी साडे दहाच्या सुमारास तालिबानी दहशतवादी व पाकिस्तानी सैनिकांमध्ये सुरू झालेला रक्तपाताचा थरार तब्बल ७ तासानंतर संपला. शेकडो निष्पाप विद्यार्थ्यांचा जीव गेल्यानंतर हा थरार संपला.
12 / 12
शाळेतून परतणारा आपला चिमुकला आता कधीच परतणार नाही...ही वास्तवता स्वीकारण्यास आईची मानसिकताच राहिली नसून आपल्या लाडक्या मुलाच्या शवपेटीकडे पाहून शेकडो आईचा शोक अनावर झाला.