1 / 10संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात असे समोर आले आहे की, कोरोना संकट काळात सुद्धा उत्तर कोरिया अत्यंत वेगाने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रोग्रॉमवर काम करत आहे. 2 / 10अहवालानुसार, उत्तर कोरियाने आणखी एक अणुबॉम्ब तयार केला आहे. तसेच, या वर्षाच्या सुरूवातीपासूनच उत्तर कोरिया नवीन क्षेपणास्त्रे बनविण्यावर सातत्याने काम करत असल्याचे वृत्त आहे.3 / 10डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्राच्या नवीन रिपोर्टवरून असे सूचित होते की, उत्तर कोरियावर लादलेले सर्व निर्बंध निष्पन्न झाले आहेत. 4 / 10उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन आपले मिशन झपाट्याने पूर्ण करीत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने नियुक्त केलेल्या देखरेखीच्या तज्ज्ञांनी एक नवीन रिपोर्ट तयार केला आहे.5 / 10तज्ज्ञांच्या मते, बंदी असूनही किम जोंग उन यांचे सरकार बंदी घातलेल्या वस्तू खरेदी-विक्री करण्यात यशस्वी ठरले आहे. यासाठी उत्तर कोरियाने नवीन मार्ग शोधले आहेत. 6 / 10मंगळवारी उत्तर कोरियाची सरकारी संस्था केसीएनएने किम जोंग उन यांचे नवीन फोटो प्रसिद्ध केले होते आणि त्यांना वर्कर्स पार्टी ऑफ कोरियाच्या बैठकीत भाग घेताना दाखविले होते.7 / 10टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, असे समजले जात आहे की, उत्तर कोरियाने लहान आकाराचा अणुबॉम्ब बनवून मोठे यश संपादन केले आहे, कारण त्याला बॅलिस्टिक क्षेपणास्त्रावर बसविले जाऊ शकते. 8 / 10यापूर्वी 2017 मध्ये उत्तर कोरियाने बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. जी अमेरिकेला हादरा देण्यास सक्षम आहे.9 / 10उत्तर कोरिया 2006 पासून संयुक्त राष्ट्रांच्या बंदीचा सामना करत आहे. अणुबॉम्ब आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रोग्रॉम सुरू केल्यामुळे निर्बंध लादण्यात आले आहेत. 10 / 10अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन यांनी 2018 पासून तीन वेळा भेट घेतली असली तरी उत्तर कोरियाने आण्विक शस्त्रे सोडण्यास सहमती दर्शविली नाही.