Joe Biden Swearing Ceremony : अमेरिकेसाठी कसोटीचा काळ, जो बायडन यांच्या पहिल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
By बाळकृष्ण परब | Updated: January 20, 2021 23:23 IST
1 / 9अमेरिकेचे ४६ वे राष्ट्रपती म्हणून जो बायडन यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी बायडन यांनी आपल्या पहिल्या अध्यक्षीय भाषणात आजचा दिवस हा लोकशाहीचा दिवस असल्याचं सांगत अमेरिकेसमोर असलेल्या आव्हानांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे2 / 9एका विषाणूमुळे अमेरिकेतील एवढ्या लोकांचा मृत्यू झाला. तेवढे मृत्यू महायुद्धातही गेलेले नाहीत. कोरोनामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यांच्या कुटुंबीयांसाठी चिंतीत असल्याचे बायडन यांनी सांगितले.3 / 9बायडन यांनी आपल्या भाषणात अमेरिकेत निर्माण झालेल्या मनभेदांबाबत चिंता व्यक्त केली. तसेच देशाला दुरुस्त करण्याची गरज विषद करत, अमेरिकेचे ऐक्य साधण्याचा निर्धार व्यक्त केला.4 / 9अध्यक्षीय निवडणुकीनंतर काही दिवसांपूर्वी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांबाबत भाष्य करताना कॅपिटल हिलसारखा हिंसाचार पुन्हा होणार नाही, असे वचन बायडन यांनी आपल्या भाषणातून जनतेला दिले. तसेच वर्णभेदाविरोधात लढण्याची गरजही विषद केली. 5 / 9गेल्या काही काळातील घटनांमुळे अमेरिकेतील जनमन दुभंगले आहे. त्या पार्श्वभूमीवर मी सर्वं अमेरिकन नागरिकांचा राष्ट्राध्यक्ष बनण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन बायडन यांनी दिले6 / 9जागतिक राजकारणाबाबत भाष्य करताना बायडन यांनी अमेरिका आपल्या आघाड्या पुन्हा एकदा बांधणार आहे. आम्ही शक्तीच्या जोरावर नेतृत्व करणार नाही. तर बळाचा वापर करून शक्तीसह कसे काम करायचे हे दाखवून देऊ. 7 / 9भाषणाच्या सुरुवातील आजचा दिवस हा लोकशाहीचा आहे असे सांगणाऱ्या बायडन यांनी आम्हाला संविधान आणि लोकशाहीचे् रक्षण करावे लागेल, असे आपल्या पहिल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. 8 / 9आपल्या कार्यकाळाचा उद्देश सर्वांचा विकास आणि सर्वांचे रक्षण हा राहील असेही बायडन यांनी स्पष्ट केलं. 9 / 9सध्याचा काळ हा अमेरिकेसाठी परीक्षेचा आहे. मात्र या परीक्षेत आम्ही यशस्वी होऊ असा विश्वासही बायडन यांनी व्यक्त केला.