CoronaVirus Live Updates : संकटं संपता संपेना! कोरोनानंतर Bell's Palsy चा सर्वाधिक धोका; 'ही' लक्षणं आढळल्यास वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 09:25 IST
1 / 15जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. काही देशांत कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 2 / 15जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 18 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांन आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. 3 / 15कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना ब्लॅक फंगस, डेल्टा प्लस याचा देखील कहर पाहायला मिळत आहे. यातच आता आणखी एका गोष्टीची भर पडली असून रिसर्चमधून धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. 4 / 15कोरोना रुग्णांना आता Bell's Palsy चा धोका असल्याचं समोर आलं आहे. यामुळे पुन्हा एकदा लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बेल्स पाल्सी म्हणजे चेहऱ्याला लकवा मारणं. कोरोना रुग्णांमध्ये याचा सातपट अधिक धोका असल्याची माहिती मिळत आहे.5 / 15मीडिया रिपोर्ट्सनुसार, युनिव्हर्सिटी हॉस्पिटल क्लीव्हलँड मेडिकल सेंटर आणि केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन या संस्थांमधल्या शास्त्रज्ञांनी एक नवा रिसर्च केला आहे. 6 / 15कोरोनाच्या एक लाख रुग्णांपैकी 82 जणांना बेल्स पाल्सी विकार झाल्याचं रिसर्चमध्ये आढळलं. तर कोरोना लस घेतलेल्या एक लाख लोकांपैकी फक्त 19 जणांना हा त्रास झाला. बेल्स पाल्सीपासून बचाव करण्यासाठी लस घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 7 / 15बेल्स पाल्सी हा शरीरातल्या स्नायूंशी निगडित असलेला अर्धांगवायूसदृश (Paralysis) विकार आहे. अर्धांगवायूमध्ये अर्धं शरीर निकामी होतं. बेल्स पाल्सीमध्ये चेहऱ्याच्या एका बाजूवर वाईट परिणाम होतो. 8 / 15रुग्णाला यामध्ये गाल फुगवण्यास, गालाची हालचाल करण्यास त्रास होतो. याचा डोळ्यांच्या पापण्यांवर आणि भुवयांवरही परिणाम होतो. डोळ्यांच्या पापण्या मिटलेल्या राहतात. हा विकार होण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 9 / 15संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हा त्रास उद्भवल्यावर दोन महिन्यांत यावर योग्य उपचार करण्यात आले, तर हा विकार लवकर बरा होऊ शकतो. यातून बाहेर येण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधीही लागू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.10 / 15उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना, मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांना तसेच काही गंभीर आजार असलेल्या लोकांना बेल्स पाल्सीचा सर्वाधिक धोका असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच लक्षणं आढळल्यास वेळीच सावध व्हा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 15जगभरातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. काही देशांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषणा केली आहे. तर काही देशांमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहेत. याच दरम्यान WHO ने जगभरात कोरोनाची परिस्थिती बिघडत चालली असल्याची माहिती दिली आहे.12 / 15जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रसस यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, जग कोरोनामुळे धोकादायक परिस्थितीत आहे. जगात कोरोनामुळे आतापर्यंत 40 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.13 / 15काही देशांमध्ये जेथे कोरोना लसीकरण जलदगतीने केले गेले आहे, त्यांना असे वाटू लागले की रोगराई पूर्णपणे संपली आहे. तर कमी लसीकरण झालेल्या देशांमध्ये पुन्हा कोरोनाचे प्रकार वाढत आहेत असं टेड्रोस यांनी म्हटलं आहे.14 / 15अमेरिका, भारत आणि ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. या देशात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. जगात सर्वात जास्त रुग्ण हे या तीन देशांमध्ये आढळून आले आहेत.15 / 15भारतात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने जगभरातील देशांचं टेन्शन वाढवलं आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढू लागली आहे. आतापर्यंत तब्बल 100 देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळल्याची माहिती समोर आली आहे.