By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 11:35 IST
1 / 15कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. जगभरात कोरोनावर संशोधन सुरू असून लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 2 / 15कोरोनाच्या लसी संदर्भात अनेक देशात विविध चाचण्या सुरू असून काही ठिकाणी चाचण्यांना यश येत आहे. याच दरम्यान कोरोना लसी संदर्भात नवनवीन माहिती समोर येत आहे. 3 / 15जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. काही कंपन्या कोरोना लसीचे उत्पादन करत आहेत. मात्र लस उत्पादन करणाऱ्या कंपन्या लसीबाबत काही माहिती लपवत तर नाहीत ना? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. 4 / 15जगभरातील अनेक वैज्ञानिक आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांनी या कंपन्या चाचणीत पूर्ण पारदर्शकता ठेवत नसल्याच म्हटलं आहे. विशेषतः जेव्हा सुरक्षेच्या कारणास्तव लशीची चाचणी थांबते तेव्हा कंपनी याबाबत माहिती देण्यास नकार देतात.5 / 15अॅस्ट्रॉजेनेका (AstraZeneca) ही लस याचं उदाहरण आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या या लशीची चाचणी थांबवण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आली आहे.6 / 15कंपनीने रुग्णांच्या स्थितीबद्दल किंवा लसीची चाचणी थांबवण्यामागचे कारण सांगितले नाही. तसेच पॅनेलचा रिपोर्टही समोर आला नाही. कंपनी लसीबाबत फारच कमी माहिती देत आहेत. 7 / 15गेल्या आठवड्यात अॅस्ट्रॉजेनेका आणि फायझर यांच्यासह नऊ फार्मा कंपन्यांनी लसीची चाचणी झाल्याशिवाय कोरोना लस लाँच करण्यास नकार दिल्याची माहिती मिळत आहे.8 / 15तज्ज्ञांच्या मते, कंपन्यांनी केलेले विधान हे संशोधनाविषयी महत्त्वपूर्ण माहिती देण्याचे आश्वासन देत नाही. अमेरिकेतील तीन कंपन्या- अॅस्ट्रॉजेनेका, मॉडर्ना आणि फायझर - अखेरच्या टप्प्यात आहेत. या तिघांनी चाचण्यांचे प्रोटोकॉल आणि विश्लेषण प्लॅन पुढे आणला आहे.9 / 15फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बुर्ला यांनी या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेत ही लस सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की त्यांची कंपनी त्या परिस्थितीसाठी तयार आहे. फायझर आणि बायोनोटॅकची लस 'सुरक्षित' आहे आणि 2021 च्या आधी अमेरिकेतील लोकांना ही लस देण्यात येईल.10 / 15अॅस्ट्रॉजेनेका यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठात एक लस तयार केली आहे. मंजुरीनंतर कंपनीने पुन्हा यूकेमध्ये चाचण्या सुरू केल्या. आता जपानमध्येही मानवी चाचणीस सुरुवात झाली आहे. 11 / 15अॅस्ट्रॉजेनेका यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठात एक लस तयार केली आहे. मंजुरीनंतर कंपनीने पुन्हा यूकेमध्ये चाचण्या सुरू केल्या. आता जपानमध्येही मानवी चाचणीस सुरुवात झाली आहे. 12 / 15कोरोना विषाणूंची लस तयार करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. दरम्यान भारतातील लस निर्मिती करत असलेल्या कंपनीकडून एक चिंताजनक मत व्यक्त करण्यात आलं आहे. सीरमने याबाबत माहिती दिली आहे.13 / 15जगभरातील सगळ्यात मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदार पुनावाला यांनी सांगितले की, 2024 च्या शेवटापर्यंत संपूर्ण जगभरातील लोकांना पुरेल एवढ्या प्रमाणात लस तयार होऊ शकणार नाही. याशिवाय त्यांनी भारतातील सगळ्या लोकांपर्यंत लस पुरवण्याबाबतही शंका व्यक्त केली आहे. 14 / 15फायनेंशियल टाइम्समध्ये छापण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार अदार पूनावाला यांनी सांगितले की, ''औषध निर्मिती करत असलेल्या कंपन्या कमी कालावधीत संपूर्ण जगभराला लस पुरवू शकत नाहीत. त्या प्रमाणात उत्पादन क्षमता विकसित झालेली नाही.'15 / 15'पृथ्वीवरील सर्व लोकांना लस पुरवण्यासाठी 4 ते 5 वर्षांचा कालावधी लागू शकतो. तसंच एका व्यक्तीसाठी जर लसीचे 2 डोस लागत असतील संपूर्ण जगभरासाठी 15 अब्ज डोजची गरज भासू शकेल.'' आदर पुनावाला यांनी भारतातील 1.4 अब्ज लोकांपर्यंत लस पुरवण्यासाठी चिंता व्यक्त केली आहे.