1 / 11कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, अनेक देश अद्यापही त्यावर नियंत्रण मिळवू शकलेले नाहीत. चीनमधून उत्पत्ती झालेल्या कोरोनाच्या संक्रमणाची संभाव्य दुसरी लाट चीनमध्ये येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 2 / 11कोरोनाविरुद्ध लढ्यात चीन सरकारचे वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार झोंग नानशान यांनी शनिवारी सीएनएनला एक मुलाखत दिली. 3 / 11त्या विशेष मुलाखतीतही सांगितले की, डिसेंबरमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची पहिली घटना नोंदवली गेली. तेव्हा त्याच्या गंभीर परिणामांची माहिती दडपण्यात आली.4 / 11देशाच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या (एनएचसी) आकडेवारीनुसार, चीनमध्ये कोरोना विषाणूचे 82,000 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत, ज्यात किमान 4633 मृत्यू आहेत. 5 / 11जानेवारीच्या उत्तरार्धात कोरोनाचा संसर्ग चीनमध्ये झपाट्याने पसरलं, त्यानंतर वुहान शहर आणि त्याभोवतालचा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आणि प्रवासावर बंदी घालण्यात आली.6 / 11फेब्रुवारीच्या सुरुवातीस चीनमध्ये एका दिवसात 3,887 कोरोनाचे रुग्ण आढळले. महिन्याभरानंतर त्यात घसरण नोंदवली गेली असून, ते फक्त दुप्पट अंकावर थांबले. 7 / 116 मार्च रोजी अमेरिकेत 47 नवीन रुग्ण आढळले आणि महिन्याच्या अखेरीस तेथे 22,562 संक्रमित रुग्ण आढळले. चीनमधील जीवन हळूहळू सामान्य होत आहे. 8 / 11लॉकडाऊननंतर देशभरात काही शाळा व कारखाने सुरू झाले आहेत. मोठ्या प्रमाणात चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती असल्याने चिनी अधिका-यांना आता पूर्णपणे निश्चिंत राहू नये, असे झोंग यांनी सांगितले. 9 / 11अलिकडे वुहान, हेलॉन्गजियांग आणि जिलिन या ईशान्य प्रांतांमध्ये कोरोना विषाणूचे प्रमाण वाढले आहे. चीनमधील बहुतेक नागरिकांना अद्याप कोरोनाच्या संसर्गाचा धोका आहे, कारण त्यांच्यात रोग प्रतिकारशक्ती नाही. 10 / 11आम्ही या गोष्टीचा जोरदार सामना करीत आहोत आणि याबाबतीत अन्य देश आपल्यापेक्षा श्रेष्ठ नाहीत. 11 / 112003मध्ये गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम साथीचा सामना करणारे झोंग चीनमध्ये 'सार्स'चे नायक म्हणून ओळखले जातात. कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात त्यांनी देशाचे नेतृत्व केले आणि त्याचा फायदाही झाला.