शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोनाचा प्रकोप! चीनने लपवले मृत्यू पण सॅटेलाइटने केली पोलखोल; दाखवले मृतदेहांचे ढीग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 3:25 PM

1 / 14
कोरोनाने चीनमधील परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून मृतांचा आकडा देखील सातत्याने वाढत आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी रात्रभर वाट पाहावी लागत असून अनेक दिवसांचं वेटिंग देखील आहे.
2 / 14
कम्युनिस्ट पक्षाचे सरकार जगापासून कोरोनामुळे झालेले मृत्यू लपवण्याच्या कामात व्यस्त आहे. पण सॅटेलाइट फोटोंमुळे त्यांची आता पोलखोल झाली. चीनच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 7 डिसेंबर रोजी शून्य कोविड धोरण रद्द केल्यापासून कोरोनामुळे केवळ 40 लोकांचा मृत्यू झाला आहे.
3 / 14
सत्य हे आहे की, चीनमध्ये दररोज कोट्यवधी लोकांना संसर्ग होत आहे. यापैकी बहुतेक लोक असे आहेत ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे. कोरोना व्हायरस पहिल्यांदा 2019 मध्ये चीनच्या वुहानमध्ये आढळला होता. तेव्हापासून कम्युनिस्ट पक्ष आकडेमोड करून पाश्चिमात्य देशांशी वैचारिक लढाई करत आहे.
4 / 14
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत केवळ 5,272 मृत्यू झाल्याचा दावा चीनने केला आहे. त्याच वेळी, ग्लोबल हेल्थ एनालिटिक्स फर्म एअरफिनिटीचा अंदाज आहे की 1 डिसेंबर 2022 नंतरच 5 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. चीननेही कोरोनामुळे मृत्यूची व्याख्या बदलली आहे.
5 / 14
ज्यांना श्वसनासंबंधित काही समस्या आहेत किंवा श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यांचा मृत्यू झाल्यास तो कोरोनामुळे झाल्याचं मानलं जात आहे. एअरफिनिटीच्या मते, 23 जानेवारीपासून चीनमध्ये दिवसाला 25,000 लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.
6 / 14
मॅक्सर टेक्नॉलॉजीने टिपलेल्या सॅटेलाइट इमेजेसमुळे चीनचं खोटं जगासमोर आलं आहे. चीनमधील सहा शहरांतील स्मशानभूमी आणि स्मशानभूमीत वाहनांची पार्किंग पूर्णपणे भरल्याचे चित्र दिसत आहे. तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते पूर्णपणे रिकामे होते. पार्किंगसाठी शेतातील पीक कापून जागा तयार केल्याचं चित्र दिसत आहे. (सॅटेलाइट फोटो - Twitter/detresfa_)
7 / 14
वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, चोंगकिंगमधील अंत्यसंस्कार गृहातील रिसेप्शनिस्ट थकल्यासारखे म्हणाला. फोन सतत वाजत राहतात. क्षणभरही फोनचे वाजणे थांबत नाही. मी गेली सहा वर्षे इथे काम करत आहे, पण इतकी वाईट परिस्थिती पहिल्यांदाच पाहिली.
8 / 14
हजारो लोकांसाठी क्वारंटाईन केंद्रे उभारण्यात आल्याचे सॅटेलाइट फोटोंमध्ये दिसत आहे. नोव्हेंबरमध्ये चीनमध्ये झिरो कोविड धोरणाबाबत निदर्शने होत होती. या निदर्शनांमुळे घाबरून राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अचानक झिरो कोविड धोरण संपवण्याचा निर्णय घेतला.
9 / 14
चीनमधील मोठ्या लोकसंख्येला बूस्टर डोस घेतलेले नाहीत. यासोबतच बहुतांश लोकांची रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत असते. या व्हायरसपासून चिनी सेलिब्रिटीही सुटू शकलेले नाहीत. ऑपेरा स्टार चू लानलान यांचे डिसेंबरमध्ये निधन झाले. अज्ञात तापामुळे त्यांचा मृत्यू झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
10 / 14
चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. सर्वच शहरं कोरोना संसर्गाच्या विळख्यात येत आहेत. याच दरम्यान, चीनच्या तिसऱ्या सर्वाधिक लोकसंख्येच्या हेनान प्रांतातील 90 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हेनानच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
11 / 14
कोरोनाच्या पहिल्या लाटेत चीनच्या वुहान प्रांतात अशाच प्रकारे कोरोनाने कहर केला होता. जगात कोरोनाचा पहिला रुग्ण वुहानमधूनच आढळून आला होता. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, हेनान प्रांताच्या आरोग्य आयोगाचे संचालक कान क्वानचेंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 6 जानेवारी 2023 पर्यंत हेनानमध्ये कोरोना संसर्गाचा दर 89.0 टक्के होता.
12 / 14
हेनानमधील 99.4 दशलक्ष लोकसंख्येपैकी (9.94 कोटी) 88.5 दशलक्ष म्हणजेच (8.84 कोटी) लोकसंख्येला कोरोनाची लागण झाली होती. सततच्या विरोधानंतर चीनने गेल्या महिन्यात शून्य कोविड धोरण संपुष्टात आणले होते. तेव्हापासून चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.
13 / 14
चीनमधील रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक शहरातील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी बेडच शिल्लक नाहीत. औषधांचाही मोठा तुटवडा आहे. बीजिंगसह अनेक प्रांतातून धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत. येथील स्मशानभूमीवर मोठी रांग लागली होती.
14 / 14
अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांना प्रतीक्षा करावी लागली. हे सर्व असूनही चीनने आपल्या सीमा पूर्णपणे खुल्या केल्या आहेत. एवढेच नाही तर चीनमधून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वारंटाईनचे नियमही रद्द करण्यात आले आहेत. चीनवर कोरोनाची आकडेवारी लपवल्याचा आरोपही केला जात आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन