शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चीन बुडू लागला! विदेशी गुंतवणूकदार १८८ अब्ज डॉलर घेऊन फुर्रर्र...; भारताला साधावी लागेल संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 4:18 PM

1 / 7
चीनची आर्थिक हालत बेकार होत चालली आहे. श्रीलंका, पाकिस्ताननंतर कंगाल होणारा तिसरा देश हा चीन असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. बुडत्या चीनमधून पैसे काढण्यास परदेशी गुंतवणुकदारांनी सुरुवात केली आहे. याचा भारताला फायदा उचलावा लागणार आहे.
2 / 7
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार चीनच्या शेअर आणि डेटमध्ये परदेशी गुंतवणुकीत डिसेंबर २०२१ च्या तुलनेत १८८ अब्ज डॉलर म्हणजेच १७ टक्क्यांची घसरण झाली आहे. हा आकडा गेल्या जून पर्यंतचा आहे. परकीय गुंतवणूकदारांनी चिनी बाजारातून बराच पैसा काढून घेतला आहे. एकट्या ऑगस्टमध्येच चीनमधून 12 अब्ज डॉलर काढून घेण्यात आले आहेत.
3 / 7
गेल्या काही महिन्यांपासून चीनचा फुगा फुटू लागला आहे. निर्यात घटत चालली आहे. बेरोजगारी वाढत आहे. लोकांनी पैसे खर्च करायचे सोडून बचत करण्यास सुरुवात केली आहे. अशातच रिअल इस्टेट क्षेत्र पार कोलमडले आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी बुडाली आहे. पाश्चात्य देशांसोबतचा तणाव वाढत चालला आहे.
4 / 7
हाँगकाँग शेअर बाजारातील परकीय चलन 2020 च्या तुलनेत एक तृतीयांश पेक्षा कमी झाले आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेत रिअल इस्टेटची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, परंतु अलीकडच्या काळात या क्षेत्रातील संकट अधिक गडद होत आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेला वेठीस धरली गेली आहे.
5 / 7
घरे घेण्यासाठी चीनमध्ये ग्राहक मिळेनासे झाले आहेत. या सर्व कारणांमुळे विदेशी गुंतवणूकदार चीनला टाळू लागले आहेत. एमएससीआय चायना इंडेक्स सात टक्क्यांनी घसरला आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी आपला पैसा काढून घेत भारत आणि लॅटिन अमेरिकेत टाकण्यास सुरुवात केली आहे.
6 / 7
गुंतवणूकदारांनी यावर्षी चीनच्या कर्ज बाजारातून $26 अब्ज काढून घेतले आहेत. चीनचे चलन डॉलरच्या तुलनेत 16 वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचले आहे, एवढा दबाव चीनच्या युआनवर पडला आहे. चीनच्या सेंट्रल बँकेने व्याजदर वाढवायचे सोडून कमी केले आहेत. चीनच्या अर्थव्यवस्थेला यंदा पाच टक्के विकास दर साधता येणार नाही, अशी भीती जागतिक बँकांना आहे.
7 / 7
फ्लॅटच्या किमती घसरल्याने नवीन सदनिका बांधण्याची प्रक्रिया थांबली आहे. घरांच्या किंमतीमध्ये १४ टक्क्यांची घट झाली आहे. रिअल इस्टेट कंपन्या कर्ज फेडत नसल्याने भलेमोठे कर्ज देणाऱ्या बँका खस्ताहाल झाल्या आहेत. चीनच्या जीडीपीमध्ये रिअल इस्टेटचा वाटा २५ टक्के असल्याने हे क्षेत्र चिनलाच घेऊन बुडणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.
टॅग्स :chinaचीन