शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बायडन यांच्या मुलाचा प्रताप; पॉर्न साइटवर फुंकले 15 लाख, तर एका रात्रीत स्ट्रिप क्लबमध्ये उडवले 8 लाख रुपये

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 1, 2020 14:33 IST

1 / 11
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा आखाडा सध्या चांगलाच रंगला आहे. या निवडणुकीत ज्यो बायडन हे डोनाल्ड ट्रम्प यांना जबरदस्त टक्कर देत आहेत. मात्र, दुसरीकडे त्यांचा मुलगा हंटर बायडन अमेरिकन माध्यामांची हेड लाईन बनला आहे.
2 / 11
हंटर बायडनच्या एका जुन्या लॅपटॉपचा डेटा लीक झाला आहे. यात त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक सिक्रेट गोष्टी समोर आल्या आहेत.
3 / 11
डेली मेलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, हंटर बायडनने एका रात्रीतच न्यूयॉर्कच्या एका स्ट्रिप क्लबमध्ये 8 लाख रुपये खर्च केले होते.
4 / 11
स्ट्रिप क्लब शिवाय, त्याने पॉर्न वेबसाईटवर लाइव्ह शो पाहण्यासाठी जवळपास 15 लाख रुपये खर्च केल्याचेही एक बिलावरून समोर आले आहे.
5 / 11
संबंधित वृत्तानुसार, हंटरच्या लॅपटॉपमधून अशी माहिती मिळाली आहे, की जिच्या सहाय्याने त्याल ब्लॅकमेलही केले जाऊ शकते.
6 / 11
लीक झालेल्या या माहितीवरून, 50 वर्षीय हंटर बायडनने एका रात्रीत हॉटेलच्या अनेक रुममध्ये राहण्यासाठी पैसे दिल्याचेही समोर आले आहे.
7 / 11
डेली मेलच्या वृत्तानुसार, हंटर बायडन कोकेन पिताना आणि अज्ञात महिलेसोबत आक्षेपार्ह संबंध ठेवत असल्याचेही काही फोटोंमधून दिसत आहे.
8 / 11
पहिल्या पत्नीसोबत हंटरचा घटस्फोट झाला आहे.
9 / 11
घटस्फोटादरम्यानही हंटर बायडनवर, तो ड्रग्स, दारू, प्रॉस्टीट्यूट, स्ट्रिप क्लब आणि शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिलांना गिफ्ट देण्यावर मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करतो, असा आरोपही करण्यात आला होता.
10 / 11
हंटरचे वडील आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार ज्यो बायडन 2009 मध्ये अमेरिकेचे उपराष्ट्रपती झाले होते. त्यावेळी, हंटर बायडनने सिक्योरिटी सर्व्हिसला सांगितले होते, की त्यांनी एजंट्सना त्यांच्या बरोबर पाठवू नये. या मागे त्याला अधिक स्वातंत्र्य मिळावे हा हेतू होता.
11 / 11
ज्यो बायडन
टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाUSअमेरिकाUS ElectionAmerica Election