शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शेवटी ट्रेड वॉर सुरू! Donald Trump यांना धडा शिकवण्यासाठी China सरकारची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 12:58 IST

1 / 10
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सत्तेची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक वादग्रस्त निर्णय घेत आहेत. त्यात प्रामुख्याने टॅरिफबाबत घेतलेल्या निर्णयाचे पडसाद जागतिक पातळीवर उमटले आहेत. अमेरिकेने आधी मॅक्सिको, कॅनडा यांच्यावर टॅरिफ लावण्याची घोषणा केली त्यानंतर चीनवरही चाप लगावला.
2 / 10
अमेरिकेने चीनवर टॅरिफ लावण्याचे आदेश जारी केले होते. त्याला पलटवार म्हणून चीनने सोयाबीन, ज्वार, बीफ, जलचर उत्पादने, फळे, भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थासह अमेरिकेच्या कृषी उत्पादनावर १० टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे.
3 / 10
एजेंसी रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, चिनी अर्थ मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. त्यात देशात १० मार्चपासून अमेरिकेच्या काही उत्पादन आयातीवर १०-१५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीनचं हे पाऊल डोनाल्ड ट्रम्प यांनी धडा शिकवण्यासाठी घेतले आहे.
4 / 10
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनी वस्तूंवर १० टक्के टॅरिफ दर वाढवून २० टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेचा हा निर्णय व्यापक रणनीतीचा भाग होता, ज्याता हेतू चीनकडून येणाऱ्या व्यापाराला लगाम घातला जाईल. चीनशिवाय अमेरिकेने शेजारील देश कॅनडा आणि मॅक्सिको यांच्यावरही २५ टक्के टॅरिफ लागू केला आहे.
5 / 10
डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जागतिक ट्रेड वॉर सुरू होणार का असा प्रश्न निर्माण झाला. ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद जागतिक बाजारपेठेत उमटले. अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेसाठी ते धोकादायक पाऊल ठरल्याचं अर्थतज्ज्ञ सांगतात.
6 / 10
चीनकडून लावण्यात आलेल्या टॅरिफचा परिणाम अमेरिकेतील शेतकऱ्यांवर पडण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे शेतकरी त्यांच्या निर्यातीवर अवलंबून आहेत. विशेषत: चीनसारख्या मोठ्या बाजाराकडे अमेरिकेच्या शेतकऱ्यांचे लक्ष असते. या निर्णयामुळे सोयाबीन आणि डुकराचे मांस यासारख्या उत्पादनांवर सर्वाधिक परिणाम होऊ शकतो, कारण चीन या उत्पादनांचा सर्वात मोठा खरेदीदार आहे.
7 / 10
अमेरिकन उत्पादनावर लावलेल्या टॅरिफमुळे चीनमध्ये त्या वस्तूंच्या मागणीत घट होऊ शकते. ज्यामुळे किंमती घसरून अमेरिकेच्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नही घटण्याची शक्यता आहे. जर हे ट्रेड वॉर दीर्घ काळ चालले तर अमेरिकेच्या शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठेच्या शोधाचं संकट उभं राहू शकते.
8 / 10
इतकेच नाही तर चीनमध्येही अमेरिकेच्या आयात वस्तूंच्या किंमती वाढल्याने चिनी ग्राहकांना त्याचा फटका बसेल. ज्यामुळे चीन सरकारला या कृषी उत्पादनाच्या आयातीसाठी ब्राझील अथवा अर्जेटिंनासारख्या नव्या पुरवठादार देशांचा शोध घेण्याची गरज भासेल.
9 / 10
अमेरिका आणि चीन यांच्यात टॅरिफच्या संघर्षामुळे एक जागतिक ट्रेड वॉरचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे जागतिक व्यापाराची साखळी बाधित होण्याची शक्यता आहे. ज्यातून सामानांच्या किंमती वाढतील आणि जागतिक आर्थिक मंदीचा सामना करावा लागू शकतो.
10 / 10
जगातील २ बड्या अर्थव्यवस्थेच्या देशांमधील संघर्ष अन्य देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणामकारक ठरेल. कृषी क्षेत्राशिवाय उत्पादन, तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाईलसारख्या उद्योगावरही या टॅरिफ संघर्षाचा परिणाम पाहायला मिळू शकतो.
टॅग्स :AmericaअमेरिकाchinaचीनDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प