1 / 10अमेरिकन पोर्न अॅक्ट्रेस स्टॉर्मी डॅनियल्सने पुन्हा एकदा माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबच्या अपल्या कथित नात्यांसंदर्बात भाष्य केले आहे. AP या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, डॅनियल्सने ट्रम्प यांच्या सोबतच्या सेक्शुअल रिलेशनला सर्वात वाईट घटना म्हटले आहे. 'माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट 90 सेकंड कारण यामुळे मी स्वतःचाच द्वेश करू लागले,' असे डॅनियल्सने म्हटले आहे.2 / 10डॅनियल्सने ट्रम्प यांच्यावर आरोप केला असला तरी, ट्रम्प नेहमीच डॅनियल्ससोबत कुठल्याही प्रकारचे अफेयर नाकारत आले आहेत. 3 / 10ट्रम्प यांच्यावर आरोप करण्यात आला होता, की त्यांनी त्यांच्या अॅटॉर्नीच्या माध्यमाने डेनियल्सला गप्प बसण्यासाठी लाखो रुपये दिले होते. या प्रकरणात ट्रम्प यांचे अॅटॉर्नी मायकल कोहेन यांना कारागृहातही जावे लागले होते. 4 / 10डॅनियल्सने म्हटले आहे, की ट्रम्प यांची भेट झाल्यानंतर तेथून कुठल्याही प्रकारे पळून जावे, असा विचारही तिच्या मनात आला होता. तसेच या घटनेपूर्वी ट्रम्प यांच्यासोबत संबंधांबाबत आपण कधी विचारही केला नव्हता, असेही तिने म्हटले आहे. 5 / 10ट्रम्प आणि डॅनियल्सची कथित भेट 2006 मध्ये झाली होती. 6 / 10डॅनियल्सची भेट झाली तेव्हा ट्रम्प आणि मेलानिया यांचे लग्न होऊन साधारणपणे एकवर्ष झाले होते. मेलानिया ट्रम्प यांची तिसरी पत्नी आहे.7 / 10Mea Culpa नावाच्या पॉडकास्टमध्ये मायकल कोहेन यांच्याशी चर्चा करताना 41 वर्षीय पोर्न स्टारने ट्रम्प यांच्यासोबतच्या कथित संबंधांसंदर्भात नवे खुलासे केले आहेत. 8 / 10मायकल कोहेन यांच्यावरच 2016च्या निवडणुकीदरम्यान डॅनियल्सला गप्प बसण्यासाठी 94 लाख रुपये दिल्याचा आरोप होता.9 / 10या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोहेन यांनीही आपल्यावरील आरोप स्वीकारला होता. त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. 10 / 10गेल्यावर्षी जुलै महिन्यात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर त्यांना कारागृहातून सोडण्यात आले आणि उरलेली शिक्षा ते त्यांच्या अपार्टमेन्टमध्ये भोगत आहेत.