By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 10:09 IST
1 / 8कोरोना व्हायरसच्या काही वॅक्सीनच्या ट्रायल शेवटच्या स्टेजवर आली आहे. आता अमेरिकेतसहीत काही देशांमध्ये या गोष्टीवरून चिंता व्यक्त केली जात आहे की, ही वक्सीन सर्वातआधी कुणाला दिली जावी. कोणत्या लोकांना वॅक्सीनचा लिमिटेड डोस दिला जावा. जेणेकरून या महामारीपासून बचाव व्हावा किंवा याला रोखलं जावं.2 / 8आता अमेरिकेसहीत अनेक देशांतील अशा लोकांची ओळख सुरू केली जात आहे. ज्यांना सर्वातआधी वॅक्सीनचा डोस दिला जावा. यासाठी मोठे डॉक्टर्स आणि अशा लोकांचाही समावेश आहे ज्यांनी २००९ मध्ये में H1N1 इंफ्लूएंजावेळई अशी योजना केली होती.3 / 8अमेरिकेत सर्वातआधी ज्या समूहाला कोविड-१९ वॅक्सीनचा डोस देण्याबाबत बोललं जात आहे. त्यात आरोग्यकर्मी, वयोवृद्ध, फ्रन्टलाइन वर्कर्स, आयसीयूमध्ये दाखल लोक आणि जास्त गंभीर आजारी लोकांचा समावेश आहे. पण याबाबत अजून निर्णय घेतला गेलेला नाही.4 / 8अमेरिकेत क्लीनिकल ट्रायल्समध्ये दोन वॅक्सीनचे परिणाम चांगले दिसले. याची टेस्ट शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. याची टेस्ट ३० हजार लोकांवर करण्यात आली आहे. अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले की, जी वॅक्सीन चांगलं परफॉर्म करत आहे, त्यांचा पहिला डोस या वर्षाच्या शेवटपर्यंत मिळेल.5 / 8अशात आता अमेरिका सरकारकडे हा विचार करण्याचा वेळ आहे की, कोरोना व्हायरस वॅक्सीनचा पहिला डोस सर्वातआधी कुणाला दिला जावा. कारण अमेरिकेत रंगभेद हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. 6 / 8इथे अनेक एक्सपर्ट याबाबत इशारा देत आहेत की, जर वॅक्सीनेशनवेळी याबाबत काळजी घेतली गेली नाही तर मोठी समस्या होईल.7 / 8आता प्रश्न असाही उपस्थित होत आहे की, काय फ्रन्टलाइन हेल्थ वर्कर्स, डॉक्टर यांच्यासोबतच हॉस्पिटलच्या कॅफेटेरिया वर्कर्स, स्वच्छता कर्मचारी यांना इशेंसिअस सर्व्हिसेज मानलं जाईल? काय यांनाही वॅक्सीनचा पहिला डोस दिला जाईल? शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांचं काय होईल.8 / 8नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे निर्देशक फ्रान्सिस कोलिंस म्हणाले की, सर्वातआधी कुणाला वॅक्सीन द्यावी हा एक वादाचा मुद्दा आहे. यावर कुणीही उत्तर देऊ शकणार नाही. अमेरिकन सरकार सध्या प्राथमिकता ठरवण्यात बिझी आहे.