1 / 8वाफाळलेल्या चहासोबत अनेकांची सकाळ होते. तर काहींना दिवसांतून खूप वेळा चहा पिण्याची सवय असते. दरवर्षी 21 मे हा दिवस इंटरनॅशनल टी डे (International Tea Day) म्हणून साजरा केला जातो. 2 / 8आजकाल चहाचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. ब्लॅक टी, ग्रीन टी, लेमन टी, मसाला चहा असे विविध प्रकार आहेत. अनेकांना दुधाचा चहा हा सर्वाधिक आवडतो. पण चहाचे जसे फायदे आहेत तसे काही तोटे देखील आहेत. 3 / 8चहामध्ये दूध मिसळलं की तो टॉक्सिक होतो. विशेषत: ज्यांना आरोग्याशी काही समस्यांचा सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी दुधाच्या चहाचा एक घोट विषासारखा आहे. या समस्यांबाबत अधिक माहिती जाणून घेऊया...4 / 8जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर दुधाच्या चहाचे सेवन फार कमी करा किंवा अजिबात करू नका. एनसीबीआयच्या मते, चहामध्ये टॅनिन नावाचं संयुग असतं जे शरीराला लोह शोषून घेण्यापासून रोखतं.5 / 8चहा प्यायल्याने ताजेतवानं वाटतं. पण तुम्ही डिप्रेशन किंवा स्ट्रेसमधून जात असाल तर चहाचं सेवन करू नका. चहा प्यायल्याने त्याची लक्षणं अधिक तीव्र होऊ शकतात.6 / 8जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर त्यामागचं सर्वात मोठं कारण चहा असू शकतं. NIH मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, कॅफिन मेलाटोनिनचे उत्पादन थांबवते, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता खराब होते.7 / 8दुधाचा चहा घेतल्याने अपचन होऊ शकतं. त्यात असलेले कॅफिन आणि फॅट मिळून गॅस, ब्लोटिंग आणि ॲसिड रिफ्लक्स होतात.8 / 8जर तुम्हाला हृदयासंबंधित आजार असेल तर दुधाचा चहा घेऊ नका. हा आजार वाढू शकतो. कमी प्रमाणात साखर असलेला आणि दूध नसलेला चहा पिणे हृदयासाठी फायदेशीर आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.