1 / 10देशात एकीकडे कोरोना वेगाने पसरताना दिसतोय तर दुसरीकडे लसीकरणानंतर रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं दिसून येतंय. भारतात मागील १७ दिवसांपासून कोविड १९ च्या रुग्णांमध्ये सतत घट होत आहे. १५ आठवड्यापासून देशात कोविड टेस्ट मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. 2 / 10नवी दिल्ली येथील एम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोना संक्रमणातून बरे झाल्यानंतरही काही लोकांना लक्षणं दिसून येत असल्याचं म्हटलं आहे. ज्यांना कोरोनाची लक्षण दिसत आहेत त्यांनी तातडीने उपचार घेण्याची आवश्यकता असल्याचंही ते म्हणाले. 3 / 10एम्स प्रमुखांच्या माहितीनुसार, जर शरीरात कोरोनाची लक्षणं ४ ते १२ आठवड्यापर्यंत कायम राहत असतील तर त्याला ऑनगोइंग पोस्ट कोविड एक्यूट सिंड्रोम असं म्हणतात. जर लक्षणं १२ आठवड्यापेक्षा अधिक काळ दाखवत असतील तर त्याला पोस्ट कोविड सिंड्रोम किंवा लॉन्ग कोविड बोललं जातं. 4 / 10डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, श्वास घेण्यास त्रास होणं हे पोस्ट कोविड लक्षणांमध्ये सर्वसामान्य आहे. त्याशिवाय नॉर्मल लंग कॅपेसिटी असल्याने काही लोकांना चालताना त्रास होऊ शकतो. छातीत दुखणे, थकवा ही समस्या जाणवेल. ही काही लक्षणं आहेत ज्यावर सर्वांनी लक्ष देणं गरजेचे आहे. 5 / 10काही लोकांना कोविड १९ मधून बरे झाल्यानंतर काही आठवडे खोकला कायम राहतो आणि हायप्लस रेट वाढतो. ही लक्षणं शरीरातील इम्यून सिस्टम किंवा बॉडी इम्लैमैटरी रिस्पॉन्स या कारणामुळे होऊ शकतो असं डॉ. गुलेरिया यांनी सांगितले. 6 / 10क्रोनिक फेटीग सिंड्रोम(असा आजार आहे ज्यात कोणत्याही मेहनतीच्या कामाशिवाय थकवा जाणवतो) त्या लोकांमध्ये जाणवतो जे कोविड १९ आजारातून बरे झालेत. अशा लोकांना अंगदुखी, थकवा, डोकेदुखीची समस्या उद्भवते. 7 / 10या आजारावर उपचाराची आवश्यकता आहे. बरे झाल्यानंतर मल्टीडिसिप्लिनरी पोस्ट कोविड क्लीनिक विकसित करण्याची आवश्यकता आहे असं एम्सचे प्रमुख डॉ. गुलेरिया म्हणाले आहेत. 8 / 10त्याशिवाय कोविड १९ आजारातून बरे झालेल्यांमध्ये एक विचित्र प्रकाराची समस्या होत असल्याचं दिसून येते. ब्रेन फॉग असं नाव त्याला दिलं आहे. ब्रेन फॉगमुळे लोकांची एकाग्रता कमी होत असल्याचं आढळलं. निद्रानाश(झोप न येणे) आणि नैराश्यासारख्या समस्या उद्भवत आहेत.9 / 10कोविड १९ लक्षणांचा सामना करणाऱ्या लोकांमध्ये रिहैबिलिटेशन(निरोगी आयुष्य) पुन्हा व्यवस्थित करायला हवं. त्यासाठी रुग्णांना मल्टिडिसिप्लिनरी पोस्ट कोविड क्लिनिक उघडण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे रुग्णांच्या बरे होण्याचं प्रमाण वाढेल. 10 / 10आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात २३ हजार ०६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९२.७६ टक्क्यांवर गेला आहे. तसेच गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण २४ हजार ७५२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.