Omicron Variant : टेन्शन वाढलं! वेगाने पसरतोय Omicron चा नवा व्हेरिएंट Centaurus; 20 देशांमध्ये प्रसार, तज्ज्ञ म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 16:28 IST
1 / 11कोरोनाने पुन्हा एकदा प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत देशभरात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असून संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अनेक राज्यात पुन्हा मास्क सक्ती करण्यात आली आहे. 2 / 11दिल्लीसह भारतातील अनेक शहरांमध्ये कोरोना पुन्हा वेगाने पसरत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, शास्त्रज्ञांना भीती आहे की वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट 'सेंटॉरस' आहे जो पुढील जागतिक कोरोना व्हेरिएंटमधून सिद्ध होऊ शकतो पण सध्या तो किती धोकादायक आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 3 / 11कोरोना व्हायरस हा सातत्याने म्यूटेट होत आहे म्हणूनच नवनवीन व्हेरिएंट समोर येत आहेत. कोरोना सेंटॉरसचा हा नवीन व्हेरिएंट आतापर्यंत जवळपास 20 देशांमध्ये पसरला आहे आणि त्याचा प्रसार खूप वेगाने होत आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दिलासा देणारी बाब आहे की मजबूत प्रतिकारशक्तीमुळे भारतासह सर्व देशांमध्ये त्याचा प्रभाव कमी दिसत आहे. 4 / 11कोरोना संसर्गामध्ये वेगाने वाढ होत असूनही सेंटॉरसने संक्रमित असलेल्या रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. सेंटॉरस हा Omicron BA.2.75 चा नवीन व्हेरिएंट आहे, जो भारतात वेगाने वाढत आहे. BA.2.75 हा इतर Omicrons पेक्षा हे अद्याप कमी किंवा जास्त धोकादायक असल्याचे दिसत नाही. 5 / 11कोरोनाच्या म्युटेशनने चिंता वाढवली आहे. भारतात सेंटॉरसचा प्रसार झपाट्याने होऊ लागला आहे. परंतु असे म्हटले जात आहे की ओमायक्रॉनचे हे नवीन व्हेरिएंट सेंटॉरस BA.5 ची जागा घेईल, कदाचित लवकरच हा भारतातील कोरोनाचे मुख्य सब व्हेरिएंट बनेल. हे शक्य आहे की, इतर अधिक संसर्गजन्य सब व्हेरिएंटप्रमाणेच, तो जगभर पसरला आहे.6 / 11नेचर या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, सेंटॉरस म्हणजेच बी.ए. 2.75 जे जुलैमध्ये भारतात झपाट्याने वाढू लागला आणि तेव्हापासून ते आशिया आणि युरोपसह 20 देशांमध्ये पसरला आहे. अहवालानुसार, मे महिन्यापासून भारतात एक हजार नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आली, त्यापैकी दोन तृतीयांश बीए 2.75 चे होते.7 / 11आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीए 2.75 ची प्रकरणेही दिल्लीत सर्वाधिक आढळून आली आहेत पण आता ती स्थिरतेकडे वाटचाल करत असल्याचे दिसते. अहवालानुसार, BA 2.75 मध्ये A452R म्युटेशन आहे, ज्यामुळे पुन्हा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. हायब्रिड इम्युनिटीमुळे त्याचा फारसा परिणाम दिसणार नाही, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. 8 / 11ऑक्सफर्ड विद्यापीठातील विषाणूशास्त्रज्ञ शाहिझ जमील यांच्या मते, बहुतांश ठिकाणी बी.ए. 2.75 एक नवीन लहर तयार करेल. ज्या लोकांना BA-5 चा संसर्ग झाला आहे त्यांना BA 2.75 ची लागण होण्याची शक्यता नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठे यश हाती आले आहे. भारत बायोटेक कंपनीने कोरोनाच्या BBV-154 इन्ट्रानेझल लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. ही लस बुस्टर डोस म्हणून देण्यात येण्याची शक्यता आहे. 9 / 11मिळालेल्या माहितीनुसार, BBV-154 इन्ट्रानेझल लसीची पहिली आणि दुसरी चाचणी पूर्ण करण्यात आली होती. चाचणी दरम्यान, पहिला आणि दुसरा डोस म्हणून लस देण्यात आली होती. बुस्टर डोस म्हणून देखील या लशीची चाचणी करण्यात आली. बुस्टर डोस म्हणून चाचणी करताना ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा व्यक्तींवर चाचणी करण्यात आली.10 / 11कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील चाचणीत निरोगी स्वयंसेवकांना लस देण्यात आली होती. त्यामुळे लसीचा चांगला परिणाम दिसून आला. कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसले नाहीत. ही लस सुरक्षित आणि प्रभावी ठरण्याचे संकेत दिसून आले. Intra Nasal Vaccine च्या बुस्टर डोससाठी 9 ठिकाणी चाचणी करण्यात आली. भारत बायोटेकची ही लस नाकावाटे देण्यात येणार आहे.11 / 11तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीतील आकडेवारी राष्ट्रीय नियामक प्राधिकरणाकडे पाठवण्यात येणार आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी मिशन कोविड सुरक्षा सुरू केली होती. कोरोना लसीवर अधिक वेगाने काम करता यावे, यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली. सामान्यांना एक सुरक्षित, प्रभावी, स्वस्त दरात लस उपलब्ध होईल यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली होती. देशभरात आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे.