शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News: अंगात कणकण, घशात खवखव अन् खोकला; साधा ताप आहे की कोरोना? कसं ओळखाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 4:21 PM

1 / 8
देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानं परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे काळजी घेण्याचा, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
2 / 8
ताप, खोकला, खशात खवखव जाणवू लागल्यानंतर आता अनेकांनी भीती वाटते. आपल्याला कोरोना तर झाला नसेल, अशा प्रश्न अनेकांना पडतो. साधा ताप आलाय की कोरोना झालाय, अशी चिंता सतावू लागते. सामान्यांना पडलेल्या या प्रश्नाला तज्ज्ञ डॉक्टरांनी उत्तरं दिली आहेत.
3 / 8
साधा ताप आहे की कोरोना हे कसं ओळखावं आणि काय काळजी घ्यावी याबद्दल दिल्लीतील अपोलो, मॅक्स रुग्णालय, मणिपाल आणि सर गंगाराम रुग्णालयाच्या डॉक्टरांनी महत्त्वाचं मार्गदर्शन केलं. ताप, खोकला आणि घशात खवखव अशा समस्या घेऊन दररोज चार ते पाच रुग्ण येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला.
4 / 8
ताप, खोकला आणि घशात खवखव जाणवत असल्यास कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला अपोलो रुग्णालयाचे इंटर्नल मेडिसिन विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सुरनजीत चॅटर्जींनी दिला. चाचणी निगेटिव्ह आली तरी विलगीकरणात राहावं आणि ऑक्सिजन पातळी तपासून पाहवी अशी सूचना त्यांनी दिली.
5 / 8
कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येऊनही कोरोना होण्याची भीती सतावत असलेले अनेक जण दररोज ओपीडीमध्ये येत असल्याचं द्वारका येथील एचसीएमसीटी मणिपाल रुग्णालयातील संसर्गरोग सल्लागार डॉ. अंकिता बदिया यांनी सांगितलं.
6 / 8
कोरोनाविरुद्धचा लढा सुरूच आहे. मात्र अन्य व्हायरल संसर्गांचं प्रमाणदेखील कायम आहे. त्यामुळे लोकांनी घाबरू नये आणि काळजी घ्यावी. कोरोना आणि साधा ताप या दोन्हीमध्ये श्वास घेण्यास त्रास उद्भवतो, अशी माहिती बदिया यांनी दिली.
7 / 8
व्हायरल फ्लू आणि कोरोनामध्ये श्वास घेण्यास अडचणी येतात. मात्र ते कशा पद्धतीनं पसरतात यात मोठा फरक आहे. त्यामुळे फ्लू झाल्यास कोरोना इतकी चिंता करण्याची गरज नाही.
8 / 8
फ्ल्यू आणि कोरोनाची लक्षणं बऱ्यापैकी सारखी समान आहेत. मात्र कोरोनानं गंभीर रुप धारण केल्यानंतर आढळून येणारी लक्षणं वेगळी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. फ्ल्यूच्या तुलनेनं कोरोनाचा मृत्यूदर अधिक आहे. त्यामुळे कोरोनाच्या बाबतीत जास्त काळजी घेण्याचं गरजेचं आहे असं संघटनेनं म्हटलं आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या