corona vaccination : कोरोना लसीला घाबरताय, मग तुमच्यासाठी येतोय नवा पर्याय, तज्ज्ञांनी दिली Good News
By बाळकृष्ण परब | Updated: February 25, 2021 15:09 IST
1 / 7 भारतासह जगभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये चढउतार होत असतानाच अनेक ठिकाणी कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारतातली अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनंतर आता १ मार्चपासून ६० वर्षांवरील सर्वसामान्य नागरिकांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे. 2 / 7कोरोनाविरोधात व्यापक लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी अनेक गैरसमजांमुळे लोक कोरोनाच्या लसीला घाबरत आहेत. तर अनेकांना इंजेक्शनची भीती वाटत असल्याने ते लसीकरणास अनुत्सुक असल्याचे दिसत आहेत. आता अशा लोकांसाठी नवा पर्याय समोर आला आहे. 3 / 7कोरोनाविरोधात आता लोकांना लसीऐवजी गोळ्या देण्यात येऊ शकतात. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे तज्ज्ञ यावर काम करत आहेत. ऑक्सफर्ड-अॅस्ट्राजेनेका लसीच्या चीफ डेव्हलपर सारा गिल्बर्ट यांनी साँगितले की, त्यांनी इंजेक्शन फ्री डोस तयार करण्यावर काम सुरू केले आहे. 4 / 7डेली मेल या ब्रिटीश वृत्तपत्रात याबाबतचे वृत्त प्रकाशित झाले आहे. या संशोधनाबाबत गिल्बर्ट यांनी हाऊस ऑफ कॉमन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिटीसमोर सांगितले की, नेजल स्प्रेच्या माध्यमातून फ्लूवरील अनेक लसी दिल्या जातात. आता आम्ही अशाचप्रकारे काम करणारी कोरोना लस विकसित करण्यासाठी संशोधन करत आहोत. तसेच तोंडाच्या माध्यमातून लसीचे डोस देण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे ज्यांना इंजेक्शनबाबत समस्या आहेत, असे लोक टॅबलेटच्या माध्यमातून डोस घेऊ शकतील.5 / 7सध्या शास्त्रज्ञ कोविड-१९ विरोधात अशा डोसाच्या शोधात आहेत जो ताप आल्यावर मुलांना दिल्या जाणाऱ्या नेजल स्प्रे किंवा पोलिओ लसीकरणादरम्यान देण्यात येणाऱ्या टॅबलेटप्रमाणे असेल. 6 / 7गिल्बर्ट यांनी सांगितले की, कोरोना विषाणूविरोधात अशी लस विकसित होण्यामध्ये काही काळ लागू शकेल. कारण सुरक्षा आणि प्रभावाबाबत परीक्षण करावे लागेल. मात्र सध्या अशा प्रकारच्या टॅबलेटची अमेरिकेमध्ये वैद्यकीय चाचणी सुरू आहे. तर ब्रिटनमध्ये नेजल स्प्रेची चाचणी सुरू आहे. 7 / 7दुसरीकडे ऑक्सफर्ड विद्यापीठाने ब्रिटनमध्ये या महिन्यात होणाऱ्या लसीकरणापूर्वी मुले आणि तरुणांमध्ये आपल्या कोविड-१९ लसीमधून संरक्षण आणि प्रतिकारशक्ती कितपत तया होते याची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.