राष्ट्राध्यक्ष पदाचे शेवटचे माहिने मोजणारे ओबामा अनेक कारणांसाठी लक्षात राहतील. पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष होण्यापासून ते अमेरिकेच्या मोडकळीस आलेल्या अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्याची अविस्मरणीय कामगीरी त्यांनी केली.त्याबरोबरच ते जगभरात 'कूलेस्ट पॉलिटिशन' म्हणूनही ओळखले जातात. मग ते बेअर ग्रीलसोबत शो असो वा पत्नी मिशेलसोबत रोमॅण्टिक डान्स, ओबामांनी वेळोवेळी अनेक पैैलू उलगडून जगाला अचंबित केले.आदर्श रोल मॉडेल असणारे ओबामा फॅशन आयकॉन म्हणून प्रसिद्ध आहेत.कुटुंबासोबत सुट्या एन्जॉय करून आल्यावर ओबामांचा डार्क जीन्स आणि स्वेटर व शर्टवर नेव्ही विंडब्रेकर अशा डॅशिंग लूक पाहून कोणीही त्यांच्या प्रेमात पडेल.त्यांच्या या परफेक्ट लूकवर 'चेरी आॅन द केक' म्हणजे त्यांनी घातलेले सनग्लासेस. चौकोनी आकार, मॅटे ब्लॅक फ्रेम, हिरव्या शेड असणारे टिन्टेड लेन्स असणाऱ्या या सनग्लासेसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.मॉडर्न लूकला थोडा विन्टेज टच देणारा हे सनग्लासेस आॅलिव्हर पीपल्सने तयार केला आहे. 'ओपीएलएल सन' असे त्याचे नाव आहे. ४८५ डॉलर्स (३३ हजार रुपये) किंमतीचे हे सनग्लासेस उत्कृष्ट क्वालिटीच्या पोलराईज्ड जी-१५ ग्लासपासून तयार केले जातात.आता किंमत जरी खिशाला परवडणारी नसली तरी हे सनग्लासेस घातल्यावर लोक तुम्हाला ओबामांच्या नावाने हाक मारतील तेव्हा छाती नक्कीच दोन इंच वाढणार!