शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Glacier Burst in Uttarakhand: उत्तराखंडमध्ये ४०० पेक्षा अधिक Glacial Lakes बनू शकतात मृत्यूचं कारण; वैज्ञानिकांचा इशारा

By प्रविण मरगळे | Published: February 09, 2021 3:24 PM

1 / 10
उत्तराखंडला पुन्हा एकदा नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला आहे. चमोलीमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर लोकांचे लक्ष पर्वतांच्या आव्हानांकडे वेधलं आहे. याच दरम्यान वैज्ञानिकांचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्वतांमध्ये हिम तलाव निर्माण होत आहेत. जे पुढील काळात संकटाचं मुख्य कारण बनतील, २०१३ च्या दुर्घटनेतही हे पाहायला मिळालं.
2 / 10
हैदराबादच्या नॅशनल रिमोट सेसिंग सेंटर्सच्या वैज्ञानिकांनी २०१५ मध्ये एक अहवाल तयार केला होता, ज्यात जवळपास ३६२ हिम तलाव भविष्यासाठी धोकादायक असल्याचं म्हटलं होतं, चिंतेची बाब म्हणजे जवळपास १० वर्षात अशा हिम तलावांची संख्या २३५ ने वाढली आहे.
3 / 10
वैज्ञानिक सय्यद इक्बाल यांच्या मते, केवळ उत्तराखंड नव्हे तर हिमालयाच्या बहुतांश भागात हिम तलावांची संख्या वाढत आहे. ही सर्वांसाठी धोक्याची बाब आहे. कारण जितक्या संख्येने हिम तलाव असतील, तितकाच धोका वाढत जाईल आणि रविवारी जी दुर्घटना घडली तसेच संकट पुन्हा येऊ शकते.
4 / 10
त्याचसोबत Glacial Lake ची संख्या वाढत नसून त्यांचा आकारही वाढत आहे. ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगची समस्या किती मोठ्या प्रमाणात वाढत आहे याचा अंदाज घेता येऊ शकतो. रिपोर्टनुसार हिमकडा कोसळल्याने वारंवार तलावांची संख्या वाढत आहे.
5 / 10
विशेषत: अशा ठिकाणी जिथे मानवी लोकसंख्या जास्त आहे, अनेक प्रकल्प सुरू आहेत. तिथे तलावांचा आकारही वाढत आहे. त्याच्यावर संशोधन आणि अभ्यास होणं गरजेचे आहे.
6 / 10
मात्र याची दुसरी बाजू तपासली तर अशाप्रकारचे तलाव सामान्य गरजा पूर्ण करण्यासाठीही फायदेशीर आहे. ज्यामुळे शेती, वीज उत्पादनासाठी पाण्याची कमतरता भासत नाही. पण या फायद्यापेक्षा ग्लेशियर तलाव नव्या संकटांना निमंत्रण देणारा ठरतो.
7 / 10
वैज्ञानिकांचा इशारा आहे की, पर्वतीय रांगामध्ये बनणाऱ्या अशा हिम तलावांवर लक्ष ठेवणं गरजेचे आहे. कारण त्यामुळे पुढील धोका ओळखता येऊ शकतो. विशेषत: अशा ठिकाणी जिथे लोकांना पोहचणं अत्यंत कठीण तिथे तंत्रज्ञानाचा आधार घ्यायला हवा.
8 / 10
रविवारी उत्तराखंडच्या चमोली भागात दुर्दैवी घटना घडली, येथे हिमकडा कोसळल्याने अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि काही मिनिटांतच जलप्रलय आला. यात दुर्घटनेत आतापर्यंत २४ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे.
9 / 10
दरम्यान, जलप्रलयामुळे उत्तराखंडमध्ये धरण प्रकल्पावरील २०३ कर्मचारी बेपत्ता असून १८ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत, १९०० मीटर लांबीच्या या बोगद्यात ३५ लोक अडकल्याचं बोललं जात आहे. त्यांची सुटका करण्यास एनडीआरएफ व आयटीबीपीच्या ३०० जवानांनी बचावकार्य हाती घेतलं आहे.
10 / 10
उत्तराखंडमधील दुर्घटनांची कारणे नैसर्गिक आहेत. मात्र, मानवनिर्मित हस्तक्षेपामुळे नुकसानीचे प्रमाण प्रचंड वाढते. ऋषीगंगा विद्युत प्रकल्प नसता तर तो प्रकल्प कोसळल्यामुळे झालेला मृत्यूचा आकडा फार पुढे गेला नसता, मग धौलीगंगा नदीला आलेला पूर ही आताइतकी मोठी आपत्ती ठरली नसती. २०१३ च्या केदारनाथ आपत्तीलाही हे लागू होते.
टॅग्स :uttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडा