By पूनम अपराज | Updated: September 24, 2020 19:14 IST
1 / 9अत्यंत शार्प माईंड आणि कडक स्थितीचे अधिकारी म्हणून वानखेडे यांची ओळख आहे. या अधिकाऱ्याने आता ड्रग्ज प्रकरणात सुरु असलेल्या तपासाप्रकरणी बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया... 2 / 9लोकमतशी बोलताना समीर वानखेडे यांनी सांगितले, पक्के मुंबईकर असलेले समीर वानखेडे म्हणतात की त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण रूईया कॉलेजमधून पूर्ण केलं. समीर वानखेडे यांचं मूळ गाव वाशीम असून २००८ २००८ च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा अधिकारी (आयआरएस) आहेत. आयआरएसमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअरपोर्ट इंटीलिजन्स युनिट (हवाई गुप्तचर विभाग) येथे उपकस्टम आयुक्त म्हणून करण्यात आली होती. नंतर त्यांची क्षमता, कामातील नैपुण्य पाहून आंध्र प्रदेश आणि त्यानंतर दिल्लीतील केसेससाठी त्यांची तेथे बदली करण्यात आली. समीर यांना ड्रग्जशी संबंधित प्रकरणांमध्ये तज्ञ मानले जातात.3 / 9लोकमतशी बोलताना समीर वानखेडे यांनी सांगितले, पक्के मुंबईकर असलेले समीर वानखेडे म्हणतात की त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण रूईया कॉलेजमधून पूर्ण केलं. समीर वानखेडे यांचं मूळ गाव वाशीम असून २००८ २००८ च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा अधिकारी (आयआरएस) आहेत. आयआरएसमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअरपोर्ट इंटीलिजन्स युनिट (हवाई गुप्तचर विभाग) येथे उपकस्टम आयुक्त म्हणून करण्यात आली होती. नंतर त्यांची क्षमता, कामातील नैपुण्य पाहून आंध्र प्रदेश आणि त्यानंतर दिल्लीतील केसेससाठी त्यांची तेथे बदली करण्यात आली. समीर यांना ड्रग्जशी संबंधित प्रकरणांमध्ये तज्ञ मानले जातात.4 / 9२०१३ पर्यंत समीर यांनी हवाई गुप्तचर विभागात उपायुक्त म्हणून कामकाज पाहिले. त्यावेळी त्यांनी ३ हजार कारवाया केल्या. तर २०१७ पर्यंत एनआयएमध्ये (राष्ट्रीय तपास यंत्रणा) अतिरिक्त एसपी म्हणून काम केले. त्यानंतर २०१७ ते २०२० पर्यंत डीआरआय (महसूल गुप्तचर यंत्रणा) या विभागात त्यांनी सहसंचालक म्हणून आपला ठसा उमठवला. त्यानंतर २०२० ला त्यांची बदली एनसीबीचे झोनल संचालक म्हणून करण्यात आली.5 / 9समीर वानखेडे यांनी आपली धडाकेबाज कारवाई करत हवाई गुप्तचर विभागा गेल्या दोन वर्षात त्याने सुमारे 17 हजार कोटींच्या ड्रग्स जप्त करून ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड केला. हुशारी आणि क्लूच्या आधारे काम करणाऱ्या समीर वानखेडे यांच्याकडे बरीच मोठी प्रकरण हाताळण्यासाठी देण्यात आली होती.6 / 9एनआयएमध्ये असताना त्यांना अमेरिकेस विशेष प्रशिक्षणासाठी सरकारद्वारे पाठविण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी झाकीर नाईक आणि दाऊद इब्राहिम प्रकरणी तपासात महत्वाची भूमिका बजावली होती. दहशतवादी संघटना असलेल्या इसिसवर देखील कारवाई केली आहे. तर २०१९ साली त्यांनी मोठी कारवाई करत ७० कोटींचे सोनं जप्त केलं होतं.7 / 9समीर यांनी अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, राम गोपाल वर्मा यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्सच्या घरी छापे टाकले आहेत. समीर वानखेडे यांनी गायक मिका सिंगला मुंबई विमानतळावर परदेशी चलन घेऊन येताना कारवाई केली तेव्हा ते चर्चेत आले होते.8 / 9बायको प्रसिद्ध अभिनेत्री - समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. क्रांतीने अजय देवगणसोबत गंगाजल चित्रपटात काम केले आहे. याशिवाय तिने मराठी चित्रपट आणि बर्याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. यासह तिने इंग्रजी चित्रपटातही काम केले आहे आणि दिग्दर्शनासाठीही तिने प्रयत्न केला आहे.9 / 9समीर वानखेडे हे नाव बॉलिवूड सृष्टीत दरारा निर्माण करणारे जरी असले तरी त्यांची पत्नी एक अभिनेत्रीच आहे हे विशेष. क्रांती रेडकर ही समीर यांच्यासोबत १९९७ पासून रुईया कॉलेजमध्ये एकत्र शिक्षण घेत होती. त्यांचे तेव्हापासून घरोब्याचे संबंध होते. एक मैत्रीण नंतर समीर यांच्या आयुष्यात अर्धांगिनी बनली. २०१७ साली समीर यांनी क्रांती हिच्याशी लगीनगाठ बांधली.