1 / 11उत्तर प्रदेशच्या बस्तीमध्ये एका अल्पवयीन मुलीच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही मुलगी ७व्या वर्गात शिकत होती आणि १८ फेब्रुवारीला तिचे आई-वडील घरात नसताना तिच्या प्रियकराने तिची हत्या केली. 2 / 11त्यानंतर ही घटना आत्महत्या दाखवण्यासाठी तिचा मृतदेह फासावर लटकवला. नंतर खुलासा झाला की, ही हत्या नसून आत्महत्या आहे. या हत्येचं कारण हे होतं की, मुलगी प्रियकराचा फोन रिसीव्ह करत नव्हती आणि त्याने याच रागातून तिची हत्या केली.3 / 11ही घटना बस्ती जिल्ह्यातील राणीपूर गावातील आहे. इथे एका ७ व्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला मोबाइलवर बिझी राहत असल्याने तिच्या प्रियकराने तिची हत्या केली. 4 / 11हत्या आत्महत्या दाखवण्यासाठी त्याने मुलीला फासावर लटकवले होते. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा मुलीचे आई-वडील घरात नव्हते. मुलीची हत्या करून तिचा प्रियकर तेथून फरार झाला होता.5 / 11आधी तर मुलीच्या कुटुंबियांनी ही घटना आत्महत्या समजून पोलिसांना काहीच सूचना देता मुलीचा मृतदेह दफन केला होता. 6 / 11नंतर जेव्हा घरी आले तर त्यांना रूममध्ये रक्ताचे डाग दिसले आणि एक पर्स मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली आणि हत्येचा संशय व्यक्त केला.7 / 11प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता मुलीला मृतदेह खोदून पुन्हा काढण्यात आला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आले की, मुलीचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झालाय.8 / 11एसएपी रवींद्र सिंह यांनी सांगितले की, तिच्या प्रियकरावर संशय आला तर पोलिसांनी सर्व्हिलांसची मदत घेतली. पर्सवर मिळालेल्या रक्ताच्या डागांच्या आधारावर पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली. 9 / 11प्रियकराने चौकशी दरम्यान सांगितले की, दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं. दोघेही फोनवर बोलत होते. पण तिला फोन लावला की, तिचा फोन नेहमीच बिझी राहत होता. 10 / 11आरोपीने सांगितले की, याबाबत तिला विचारले तर ती टोलवाटोलवीची उत्तरे देऊ लागली होती. ज्यामुळे मला तिच्यावर संशय आला. 11 / 11मला वाटलं ती दुसऱ्या मुलासोबत बोलते. त्यामुळे मी रागात येऊन तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक करून तुरूंगात पाठवलं आहे.