मोदी सरकार 'प्रधानमंत्री नारी शक्ति योजने'अंतर्गत महिलांना देतेय ५२,००० रुपये? झाला मोठा खुलासा, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 16:49 IST
1 / 9 केंद्र सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवत असते. जर तुम्हाला एखाद्या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही अगोदर त्या योजनेच्या माहिती घ्यायला हवी.2 / 9कारण सध्या फसवणुकीचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत, सोशल मीडियावर अनेक खोट्या योजनांची माहिती दिली जात आहे. 3 / 9काही दिवसापूर्वी एका यूट्यूब चॅनलवर महिलांसाठीच्या एका योजनेचा दावा केला आहे. यात सरकार महिलांना संपूर्ण ५२,००० रुपये रोख देत आहे. पीआयबीने तथ्य तपासणी करून या बातमीतील सत्यता शोधून काढली आहे. 4 / 9पीआयबीने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये या योजनेचा खुलासा केला आहे. 'सुनो दुनिया' नावाच्या #YouTube चॅनेलच्या व्हिडीओमध्ये केंद्र सरकार 'प्रधानमंत्री नारी शक्ती योजने' अंतर्गत सर्व महिलांना ५२,००० ची रोख रक्कम देत असल्याचा दावा केला जात आहे.5 / 9पीआयबीने हा व्हिडीओ पूर्णपणे बनावट असल्याचे सांगितले आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना राबविली जात नाही.6 / 9केंद्र सरकारने पुढे म्हटले आहे की, अशी माहिती कोणाशीही शेअर करू नयेत. यासोबतच तुम्हाला सरकारशी संबंधित कोणत्याही योजनेची माहिती मिळवायची असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाइटवरच संपर्क साधावा.7 / 9अशा चुकीच्या माहितीपासून दूर राहा आणि ही माहिती कुणालाही शेअर करू नका, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. तुम्हालाही कोणत्याही व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्यायचे असेल, तर socialmedia@pib.gov.in वर मेल करू शकता.8 / 9शासनाच्या योजनासंदर्भात अनेक चुकीच्या माहिती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकांच्या यातून फसवणूक झाल्या आहेत. 9 / 9 यामुळे सोशल मीडियावर केंद्र सरकारच्या योजनांची येणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नका. जर तुम्हाला योजनांची माहिती घ्यायची असेल तर सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.