1 / 10जेव्हा आपण भाड्याने घर घेतो तेव्हा भाडे करार(Rent Agreement) बनवणे बंधनकारक असते. भाडे करारात भाडे रक्कम आणि इतर अनेक गोष्टींचा उल्लेख असतो. हा भाडेकरार तात्पुरत्या स्वरुपात घरपत्ता म्हणून कामाला येतो. 2 / 10भाडे करार हा १ वर्षासाठी बनवला जात नाही, हा करार कायम ११ महिन्यांसाठी बनवला जातो. परंतु तुम्हाला माहिती आहे का? अखेर भाडे करार हा ११ महिन्यांसाठीच का असतो? यामागे नेमकं काय कारण आहे? चला जाणून घेऊया. 3 / 10खरं तर, भारतीय नोंदणी कायदा, १९०८ च्या कलम 17(d) अंतर्गत, एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी भाडे करार किंवा लीज करार नोंदणी करणे बंधनकारक नाही. याचा अर्थ घरमालक केवळ ११ महिन्यांसाठी भाडे करार करू शकतो.4 / 10कायदेतज्ज्ञांच्या मते, याचे एक प्रमुख कारण म्हणजे आपल्या देशातील गुंतागुंतीचे कायदे आणि बहुतांश कायदे भाडेकरूंच्या बाजूने असणे. अशा परिस्थितीत, मालमत्तेच्या मालकाचा एखाद्या भाडेकरूशी वाद झाला आणि त्याला ती मालमत्ता भाडेकरूकडून रिकामी करायची असेल, तर त्याच्यासाठी हे खूप कठीण काम होते.5 / 10करारात थोडीफार चूक झाली तर मालमत्तेच्या मालकाला स्वत:च्या मालमत्तेसाठी वर्षानुवर्षे न्यायालयीन लढा द्यावा लागतो. म्हणूनच भाडे करार केवळ ११ महिन्यांसाठी केला जातो. 6 / 10भाडेकरार कायद्यात भाड्याबाबत वाद निर्माण झाल्यास आणि प्रकरण न्यायालयात गेल्यास भाडे निश्चित करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. मग घरमालक त्यापेक्षा जास्त भाडे आकारू शकत नाही.7 / 10याशिवाय ११ महिन्यांसाठी भाडे करार करण्याचे मुख्य कारण म्हणजे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क टाळणे. कारण भाडे करार एक वर्षापेक्षा कमी कालावधीचा असेल तर त्यावर देय मुद्रांक शुल्क बंधनकारक नाही.8 / 10११ महिन्यांसाठी नोटरीकृत भाडे कराराचा मसुदा तयार करणे कायदेशीररित्या वैध आहे. वाद असल्यास, हे करार पुरावे म्हणून सादर केले जाऊ शकतात. अशा भाड्याचा मसुदा तयार करण्यासाठी १०० किंवा २०० रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरला जातो.9 / 10घरमालक व भाडेकरू यांचे हित जपण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने आदर्श भाडेकरू कायदा मंजूर केला आहे. घरभाड्यावरून घरमालक व भाडेकरू यांच्यामध्ये सतत होणारे वाद मिटवण्यासाठी हा कायदा उपयुक्त ठरतो.10 / 10भाडेकरूंची नोंद कशी करायची? प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये भाडेकरूकडून भरून घ्यावयाचा अर्ज असतो. अर्जात घरमालक व भाडेकरू यांची माहिती भरावी लागते. अर्जावर दोघांचा फोटो असतो. घरमालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये झालेल्या कराराच्या प्रतीची झेरॉक्स तसेच दोघांचे ओळखपत्र या अर्जासमवेत जोडणे अनिवार्य आहे.