1 / 6मुंबईच्या लक्झरी रिअल इस्टेट मार्केटनं पुन्हा एकदा एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. वृत्तानुसार, वरळी येथे समुद्रासमोर असलेलं एक डुप्लेक्स अपार्टमेंट ६३९ कोटी रुपयांना विकलं गेलं आहे, जी आतापर्यंत भारतात विकली गेलेलं सर्वात महागडी निवासी मालमत्ता आहे. ही मालमत्ता २२,५७२ चौरस फूटांमध्ये पसरलेली आहे आणि ४० मजली इमारतीत आहे. ती यूएसव्ही इंडियाच्या अध्यक्षा लीना गांधी तिवारी यांनी खरेदी केलीये.2 / 6लीना गांधी तिवारी यांनी ३२ व्या आणि ३५ व्या मजल्यांदरम्यान दोन अल्ट्रा-लक्झरी युनिट्स खरेदी केल्या आहेत. कार्पेट एरियानुसार किंमत प्रति चौरस फूट सुमारे २.८३ लाख रुपये आहे. या मालमत्तेची नोंदणी गेल्या आठवड्यात पूर्ण झाली. कागदपत्रांनुसार, तिवारी यांनी केवळ स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटीमध्ये ६३.९ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरली आहे. मुंबईच्या दक्षिण-मध्य किनारपट्टीवर वसलेलं वरळी हे आलिशान घरांसाठी एक आकर्षण केंद्र बनलंय.3 / 6लीना गांधी तिवारी कोण आहेत? लीना गांधी तिवारीया एक आघाडीच्या भारतीय औषधनिर्माण आणि जैवतंत्रज्ञान कंपनी यूएसव्ही प्रायव्हेट लिमिटेडच्या अध्यक्षा आहे. त्या विठ्ठल बाळकृष्ण गांधी यांच्या नात आहेत, ज्यांनी १९६१ मध्ये रेव्हलॉनसोबत भागीदारीत यूएसव्हीची स्थापना केली होती. औषध आयातदार म्हणून सुरुवात केलेली ही कंपनी आता भारतातील आरोग्यसेवा क्षेत्रातील एक प्रमुख खेळाडू बनली आहे.4 / 6 लीना तिवारी या भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहे. फोर्ब्सनं दिलेल्या वृत्तानुसार २९ मे २०२५ पर्यंत त्यांची रिअल-टाइम निव्वळ संपत्ती अंदाजे ३.९ बिलियन डॉलर्स आहे. जागतिक स्तरावर, त्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये ९६४ व्या क्रमांकावर आहेत. २०२३ मध्ये, फोर्ब्स इंडियानं त्यांना भारतातील ४५ व्या श्रीमंत महिला म्हणून सूचीबद्ध केलं होतं.5 / 6बायोकॉनच्या किरण मजुमदार-शॉ आणि नायकाच्या फाल्गुनी नायर यांसारख्या प्रसिद्ध उद्योजकांपेक्षाही त्यांची संपत्ती जास्त आहे. २०२३ मध्ये, त्यांची एकूण संपत्ती ३.७ बिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी होती. लीना तिवारी या कंपनीचा चेहरा आहेत, तर सध्या त्यांचे पती व्यवसायाचं कामकाज पाहतात.6 / 6फोर्ब्सच्या मते, यूएसव्ही प्रायव्हेट लिमिटेड दरवर्षी अंदाजे ५११ मिलियन डॉलर्सचं उत्पन्न मिळवते. तिवारी यांनी मुंबई विद्यापीठातून बी.कॉम पदवी आणि बॉस्टन विद्यापीठातून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमधून पदव्युत्तर पदवी घेतली आहे.