म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मोदी सरकारला मोठा दिलासा! देशातील बेरोजगारीचा दर घसरला; महाराष्ट्रातील स्थिती जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 19:59 IST
1 / 9अलीकडेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये केंद्रातील मोदी सरकारने लाखो नव्या नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 2 / 9दुसरीकडे, वर्षाच्या सुरुवातीलाच देशातील बेरोजगारीच्या आकड्यांबाबत एक दिलासादायक बातमी आली आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात बेरोजगारीचा दर झपाट्याने घसरून ६.५७ टक्क्यांवर आला, जो मार्च २०२१ नंतर म्हणजेच गेल्या ११ महिन्यांतील सर्वात कमी आहे.3 / 9CMIE च्या आकडेवारीनुसार, ग्रामीण बेरोजगारीमध्ये तीव्र घट झाल्यामुळे एकूण बेरोजगारीच्या दरात घसरण झाली आहे. सीएमआयई अहवालात असे म्हटले आहे की, नोव्हेंबरमधील ६.९७ टक्क्यांच्या तुलनेत डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर ७.९१ टक्क्यांपर्यंत वेगाने वाढला. 4 / 9जानेवारीमध्ये बेरोजगारीचा दर कमी होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे १५ जानेवारीपासून कोविडचे निर्बंध शिथिल करणे हे आहे. प्रमुख राज्यांमध्ये कोविड प्रकरणांची संख्या कमी होऊ लागल्यानंतर व्यावसायिक गतीविधींना चालना मिळाली.5 / 9सीएमआयईच्या मते, ग्रामीण बेरोजगारी डिसेंबर २०२१ मध्ये ७.२८ टक्क्यांच्या उच्चांकावरून जानेवारीमध्ये ५.८४ टक्क्यांपर्यंत घसरली. शहरी बेरोजगारीचा दर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ९.३० टक्क्यांवरून जानेवारीमध्ये ८.१६ टक्क्यांवर घसरला.6 / 9जानेवारीमध्ये तेलंगणामध्ये सर्वात कमी म्हणजे ०.७ टक्के बेरोजगारीचा दर होता, त्यानंतर गुजरातमध्ये १.२ टक्के, मेघालयात १.५ टक्के, ओडिशामध्ये १.८ टक्के आणि कर्नाटकमध्ये २.९ टक्के बेरोजगारीचा दर होता.7 / 9भाजपची सत्ता असलेल्या हरियाणामध्ये सर्वाधिक २३.४ टक्के बेरोजगारी दर आहे. त्यानंतर राजस्थानमध्ये १८.९ टक्के, त्रिपुरामध्ये १७.१ टक्के, जम्मू आणि काश्मीरमध्ये १५ टक्के आणि राजधानी दिल्लीमध्ये १४.१ टक्के बेरोजगारी दर आहे.8 / 9मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांनी इतर राज्यांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. गुजरातमध्ये १३ पैकी १ पदवीधर बेरोजगार आहे, तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रत्येक ९ पैकी एकाकडे नोकरी नाही.9 / 9मोदी सरकार सत्तेवर येताना कोट्यवधी नोकऱ्या देण्याची आश्वासने दिली होती. मात्र, ती अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्यात या अर्थसंकल्पात आणखी लाखो नोकऱ्यांचे आश्वासन देण्यात आले आहे, यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.