1 / 8Sunil Bharti Mittal Success Story: जर तुम्हाला यशाचं शिखर गाठायचं असेल तर मेहनत आणि जिद्द हवीच. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही अशक्य गोष्टही शक्य करू शकता. टेलिकॉम कंपनी एअरटेल देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. टेलिकॉम कंपनी एअरटेलच्या मार्केट कॅपमध्ये २०२४ मध्ये ४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली. 2024 Burgundy Private Hurun India 500 नुसार, कंपनीचं मार्केट कॅप गेल्या वर्षी सर्वात वेगानं वाढत होतं.2 / 8आज कंपनीचं मार्केट कॅप ९,२६,४३३.३२ कोटी रुपयांवर पोहोचलं असून ती भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मौल्यवान कंपनी आहे. फक्त मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि टाटा समूहाची टीसीएस त्यांच्यापुढे आहे. एअरटेलनं आपल्या प्रवासात अनेक आव्हानांचा सामना केला पण प्रत्येक वेळी त्यांनी विजय मिळवला. कंपनीचे चेअरमन सुनील भारती मित्तल यांच्या प्रवासावर एक नजर टाकूया.3 / 8सुनील भारती मित्तल यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९५७ रोजी पंजाबमधील लुधियाना येथे झाला. त्यांचे वडील सतपाल मित्तल हे दोन वेळा खासदार होते. पण सुनील यांनी वडिलांप्रमाणे राजकारणात येण्याऐवजी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मसूरी येथील बिनबर्ग शाळेत झालं. 4 / 8त्यानंतर ग्वाल्हेरच्या सिंधिया स्कूलमधून त्यांचं शालेय शिक्षण झालं आणि त्यानंतर पंजाब विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेतलं असलं तरी यशाचा खरा धडा त्यांनी गल्लीबोळातून शिकला. सुनील मित्तल यांनी वडिलांकडून २० हजार रुपये घेतले आणि मित्रासोबत सायकलचा व्यवसाय सुरू केला.5 / 8त्यांनी सायकलपार्ट्स बनवण्याचा कारखाना उभारला. तीन वर्षांच्या आत त्यांनी एकाचे तीन युनिट बांधले होते. या व्यवसायात त्याने नफाही कमावला, पण सुनील यांना त्यात फारशी क्षमता दिसली नाही. सुनील मित्तल यांनी आपला सायकलचा व्यवसाय विकून इलेक्ट्रिक पॉवर जनरेटरचं काम सुरू केलं. १९८३ मध्ये सरकारनं जनरेटरच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यामुळे त्यांच्या व्यवसायाला मोठा धक्का बसला. यानंतर त्याला बीटेल नावाचा फोन आला. तो तैवानमधून ते आयात करायचे.6 / 8अखेर १९९२ मध्ये त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. सरकार प्रथमच मोबाइल फोन सेवेसाठी परवाने देत होते. त्यावेळी सुनील मित्तल यांनी सेल्युलर सर्कलचा परवानाही मिळवला होता. १९९५ मध्ये सुनील यांनी भारती सेल्युलर लिमिटेडची (BCL) स्थापना केली. यात त्यांनी एअरटेल ब्रँड आणला. २००८ पर्यंत एअरटेलच्या ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. यासह एअरटेल जगातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक बनली.7 / 8पण २०१६ मध्ये भारताची कंपनी आणि आशियातील सर्वात मोठे श्रीमंत मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओनं टेलिकॉम क्षेत्रात मोठी एन्ट्री केली. कंपनी मोफत व्हॉईस आणि डेटा सेवा देत होती. यामुळे अनेक कंपन्यांना आपलं बस्तान बांधावं लागलं. व्होडाफोन आणि आयडियानं एकमेकांशी हातमिळवणी केली. एअरटेलच्या नफ्यातही लक्षणीय घट झाली होती आणि ग्राहकांची संख्याही घटत होती. कंपनीचं अस्तित्वही धोक्यात आलं होतं. पण एअरटेलने काळानुसार स्वत:ला बदललं आणि आज ती ठामपणे उभी आहे.8 / 8सुनील मित्तल २२.५ अब्जाच्या नेटवर्थसह भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक आहेत. भारती एअरटेलमध्ये त्यांचा २५ टक्के हिस्सा आहे. भारती एंटरप्रायजेस आणि इतर होल्डिंग कंपन्यांमध्येही त्यांचा हिस्सा आहे. भारती एअरटेलचा व्यवसाय १७ देशांमध्ये पसरलेला असून त्यांचे ४९ कोटींहून अधिक ग्राहक आहेत. ब्रुकफिल्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्टमध्ये मित्तल यांचा ५० टक्के हिस्सा आहे.