शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पोस्टाच्या ‘या’ ३ स्कीम्स कठीण काळासाठी करतील पैशांची व्यवस्था; गुंतवणूक कमी, खिशावर पडणार नाही ताण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 08:45 IST

1 / 7
Post Office Jan Suraksha Schemes: पोस्ट ऑफिसमध्ये सर्वसामान्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. यातील ३ योजना अशा आहेत ज्या लोकांना कठीण काळात मदत करतात. या योजनांच्या माध्यमातून कठीण काळात तुमच्यासाठी आणि कुटुंबासाठी पैशांची सहज व्यवस्था करता येऊ शकते.
2 / 7
या योजनांना जनसुरक्षा योजना म्हणतात. या योजनांमध्ये तुम्हाला एवढी कमी गुंतवणूक करावी लागते की तुमच्या खिशावर कोणताही ताण पडत नाही. जाणून घेऊया या योजनांबद्दल अधिक माहिती.
3 / 7
पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना - ही टर्म इन्शुरन्स योजना आहे जी तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या कुटुंबाला आर्थिक मदत करते. या योजनेअंतर्गत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना २ लाखांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
4 / 7
जर एखाद्या व्यक्तीला सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला वार्षिक केवळ ४३६ रुपये भरून ही स्कीम खरेदी करावी लागेल. ४३६/१२ = ३६.३ म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीनं दरमहा सुमारे ३६ रुपयांची बचत केली तर तो आरामात त्याचा वार्षिक प्रीमियम भरू शकतो. १८ ते ५० वयोगटातील कोणीही हा विमा प्लॅन खरेदी करू शकतो.
5 / 7
पंतप्रधान सुरक्षा विमा योजना - पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा फायदा विशेषत: अशा लोकांना होऊ शकतो जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि खाजगी विमा कंपन्यांचे हप्ते भरणे परवडत नाहीत. २०१५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या सुरक्षा विमा योजनेत अपघात झाल्यास २ लाखांपर्यंत विमा संरक्षण दिलं जातं. या योजनेचा वार्षिक प्रीमियम केवळ २० रुपये आहे.
6 / 7
ही एक अशी रक्कम आहे जी गरीब लोकदेखील सहज भरू शकतात. अपघातादरम्यान विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम त्याच्या नॉमिनीला दिली जाते. त्याचबरोबर पॉलिसीधारकाला अपंगत्व आल्यास त्याला नियमानुसार १ लाख रुपयांची मदत मिळते. या योजनेचा लाभ वयाच्या १८ ते ७० वर्षांपर्यंत घेता येतो. जर लाभार्थीचं वय ७० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना बंद केली जाईल.
7 / 7
अटल पेन्शन योजना - जर तुम्हालाही तुमच्या वृद्धापकाळासाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करायची असेल तर तुम्ही सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (APY) गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत दरमहा ५,००० रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकतं. मात्र, तुम्हाला किती पेन्शन मिळेल हे तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून असतं. कोणताही भारतीय नागरिक जो करदाता नाही आणि ज्याचे वय १८ वर्षे ते ४० वर्षे आहे तो सरकारच्या या योजनेत योगदान देऊ शकतो.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूक