शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आधारमध्ये कोणती माहिती अपडेट करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही, कार्डाला वैधता असते का? जाणून घ्या कामाची गोष्ट

By जयदीप दाभोळकर | Updated: March 17, 2025 08:58 IST

1 / 7
Aadhaar Card Update Rules: आधार कार्ड हे भारतात वापरले जाणारे सर्वात सामान्य दस्तऐवज आहे. देशातील ९० टक्के लोकसंख्येकडे आधार कार्ड आहे. शाळा-महाविद्यालयात प्रवेश घेण्यापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत आधार कार्डाची गरज असते. अनेकदा आधार कार्ड बनवताना लोकांकडून काही चुकीची माहिती नोंदवली जाते. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.
2 / 7
आधार कार्ड चालवणाऱ्या यूआयडीएआय या संस्थेकडून लोकांना त्यात बदल करण्याची संधी मिळते. अनेकदा ती माहिती कालबाह्य होते. जी तुम्हाला नंतर अपडेट करावी लागते. आधार कार्डमधील काही माहिती अपडेट करण्याची मर्यादा आहे. तर अशी काही माहिती आहे, त्याच्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. याविषयीच जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
3 / 7
आधार कार्डमध्ये जिथे काही माहितीसाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. परंतु तुमच्या घराच्या पत्त्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. अनेक जण भाड्याच्या घरात राहतात. ज्यांना काही काळानंतर आपलं घर बदलावं लागतं. अशा लोकांना घराचा पत्ता बदलावा लागतो. तुम्ही जितक्यांदा घर बदलता तेवढ्याच वेळा तुम्ही आधार कार्डमधील पत्ता बदलू शकता. आधार कार्डमधील पत्त्याबाबत यूआयडीएआयनं कोणतंही बंधन घातलेलं नाही.
4 / 7
आधार कार्डमध्ये पत्त्याव्यतिरिक्त आणखी एक माहिती आहे. जी तुम्ही हव्या तितक्या वेळा बदलू शकता. ही माहिती म्हणजे तुमच्या आधार कार्डसोबत लिंक केलेला मोबाइल नंबर. आधार कार्डमध्ये लिंक केलेल्या मोबाईल नंबरनं तुमची बरीचशी कामं होतात. त्यासाठी आधार कार्ड सोबत असण्याचीही गरज नाही. ओटीपीच्या माध्यमातूनच तुम्ही बरीच कामं करू शकता.
5 / 7
पण जर तुमच्या आधार कार्डमध्ये लिंक केलेला मोबाईल नंबर बंद असेल किंवा ते काम करत नसेल तर तुमच्यासाठी अडचणी येऊ शकतात. म्हणूनच असं होण्यापूर्वी आपण आधार कार्डमधील लिंक केलेला क्रमांक बदलला पाहिजे. यासाठी कोणत्याही प्रकारे मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही आधारमधील मोबाईल नंबर बदलू शकता.
6 / 7
आधार हे महत्त्वाचं दस्तऐवज आहे, अशातच अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की आधार कार्डला काही वैधता आहे की नाही? काही वर्षांनंतर ते अवैध ठरू शकते का? याबाबत अनेक अफवाही पसरल्या होत्या. यूआयडीएआय म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियानं यासंदर्भात स्पष्टीकरणही दिलंय. आधार कार्डाची कोणतीही एक्सपायरी डेट नाही. हे आयुष्यभरासाठी वैध आहे आणि त्यात सातत्यानं अपडेट करण्याची आवश्यकता नसल्याचं सांगण्यात आलं. मात्र, ठराविक वयोगटातील मुलांचं आधार कार्ड अपडेट करणं बंधनकारक आहे.
7 / 7
यूआयडीएआयनं हे देखील स्पष्ट केलंय की, जर एखाद्या व्यक्तीनं १० वर्षांनंतरही आपलं आधार कार्ड अपडेट केलं नाही तरी ते वैध राहील. मात्र, भविष्यात कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी ते अपडेट करून घेण्याचा सल्ला दिला जातो. आधार अपडेट करण्यासाठी कोणत्याही आधार सेवा केंद्रात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड