By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 14:46 IST
1 / 8टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त मेहली मिस्त्री यांनी टाटा ट्रस्ट्समधील 'उपाध्यक्ष' हे पद रद्द करण्याची मागणी केली आहे. ट्रस्टच्या नियमावलीत अशा कोणत्याही पदाची तरतूद नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.2 / 8मिस्त्री यांच्या मते, हे उपाध्यक्ष पद तेव्हा निर्माण करण्यात आले होते जेव्हा रतन टाटा हे सायरस मिस्त्री यांच्यासोबतच्या कायदेशीर लढाईत व्यस्त होते. आता अशी परिस्थिती नसल्याने या पदाची गरज नसल्याचे त्यांनी मुंबईतील बैठकीत स्पष्ट केले.3 / 8२०१८ मध्ये टाटा ट्रस्टने माजी संरक्षण सचिव विजय सिंह आणि टीव्हीएस मोटरचे वेणू श्रीनिवासन यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. मेहली मिस्त्रींच्या या मागणीमुळे या दोन महत्त्वाच्या व्यक्तींच्या पदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.4 / 8मेहली मिस्त्री हे टाटा समूहाच्या मुख्य 'दोराबजी टाटा' आणि 'रतन टाटा' या दोन मोठ्या ट्रस्टमध्ये आता विश्वस्त नाहीत. त्यामुळे या प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार सध्याचे अध्यक्ष नोएल टाटा यांच्याकडे आहेत.5 / 8गेल्या वर्षी २८ ऑक्टोबर रोजी मुख्य ट्रस्टच्या विश्वस्तांनी मेहली मिस्त्रींच्या फेरनियुक्तीला मान्यता दिली नव्हती. सध्या ते फक्त TEDT, टाटा मेडिकल सेंटर (कोलकाता) आणि ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या बोर्डावर सक्रिय आहेत.6 / 8टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्टच्या बोर्डावर सध्या अध्यक्ष नोएल टाटा यांच्यासह विजय सिंह, वेणु श्रीनिवासन, जहांगीर मिस्त्री आणि स्वतः मेहली मिस्त्री यांचा समावेश आहे.7 / 8विश्वस्तांमधील हा संघर्ष सप्टेंबर २०२५ पासून सुरू आहे. त्यावेळी झालेल्या तीव्र मतभेदानंतर मेहली मिस्त्री यांच्यासह काही विश्वस्तांना मुख्य ट्रस्टच्या बोर्डातून बाहेर पडावे लागले होते.8 / 8विश्वस्तांमधील हा नवीन वाद टाटा ट्रस्ट्सच्या प्रशासकीय रचनेत बदल घडवून आणणार का, याकडे कॉर्पोरेट जगताचे लक्ष लागले आहे. नोएल टाटा यांच्या नेतृत्वाखाली ट्रस्ट या अंतर्गत वादावर कसा मार्ग काढते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.