₹6 च्या शेअरची कमाल, 5 वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याजवळ आहे का हा करोडपती बनवणारा स्टॉक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 15:05 IST
1 / 10शेअर बाजारात उच्च परतावा मिळविण्यासाठी, गुंतवणूकदारांना योग्य स्टॉक दीर्घकाळापर्यंत होल्ड करून ठेवावा लागतो. असाच एक स्टॉक म्हणजे अॅग्रो इंडस्ट्रीज. गेल्या ५ वर्षात या शेअरच्या किमतीत जबरदस्त वाढ दिसून आली आहे. 2 / 10एकेकाळी या स्टॉकची किंमत ६ रुपयांपेक्षाही कमी होती. आता तो ७०० रुपयांच्या वर पोहोचला आहे. या कालावधीत, कंपनीच्या शेअर्सच्या किमतींमध्ये १४२ पटीहूनही अधिक वाढ झाली आहे. ज्यामुळे स्थितीगत गुंतवणूकदार करोडपती बनले आहेत.3 / 10गेल्या एका महिन्याचा विचार करता, या कालावधीत कंपनीच्या शेअरची किंमत घसरली आहे. नफा बुकिंगमुळे, अॅग्रो इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत १०१२.५५ रुपयांवरून ७८२.५० रुपयांवर आली आहे.4 / 10गेल्या ६ महिन्यांपूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी हा स्टॉक खरेदी केला, ते ५ टक्के नफ्यात आहेत. याच वेळी, एका वर्षात स्टॉकची किंमत २९२.२० रुपयांवरून ७८२ रुपयांपर्यंत वाढली आहे. यामुळे गेल्या एका वर्षात स्थितीगत गुंतवणूकदारांना १७० टक्क्यांहून अधिक नफा मिळाला आहे.5 / 1027 मार्च 2020 रोजी कंपनीचा शेअर 5.52 रुपयांवर होता. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये 142 पट तेजी आली आहे.6 / 10गुंतवणूकदार मालामाल - जर एखाद्या गुंतवणूकदाराने एक वर्षापूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आतापर्यंत त्याचे २.७० लाख रुपये झाले असते. 7 / 10जर एखाद्या गुंतवणूकदाराने ५ वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आतापर्यंत तिचे मूल्य १.४२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असते. अर्थात केवळ ५ वर्षांतच या स्टॉकने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.8 / 10कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1019.90 रुपये प्रति शेअर आहे. तर निचांक 278 रुपये प्रति शेअर एवढा आहे.9 / 10(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)10 / 10(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)