शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Profit Without Risk ची स्ट्रॅटजी; बनेल २ कोटी २६ लाख रुपयांचा फंड, जाणून घ्या कशी होईल ही जादू

By जयदीप दाभोळकर | Updated: April 3, 2025 09:05 IST

1 / 8
Investment Tips: एसआयपी ही कोट्यधीश बनवणारी योजना मानली जाते कारण त्याचा परतावा दीर्घ काळासाठी खूप चांगला मानला जातो. पण ही योजना बाजाराशी निगडित असल्याने त्यात तुम्हाला किती परतावा मिळेल याबद्दल काहीही सांगता येत नाही. त्याचा परतावा अंदाजित आधारावर मोजला जातो.
2 / 8
मात्र, एक अशी योजना आहे ज्यात तुम्हाला कोट्यधीश बनवण्याचीही ताकद आहे आणि त्यात तुमचे पैसेही सुरक्षित राहतात, कारण तुमच्या गुंतवणुकीवर सरकारी गॅरंटी असते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या योजनेतून २ कोटींहून अधिक निधी उभा करू शकता. जाणून घ्या ही कोणती आहे ही योजना.
3 / 8
ज्या गुंतवणूकदारांना कोणतीही जोखीम न घेता गुंतवणूक करायला आवडते त्यांच्यासाठी ही सरकारी योजना खूप चांगली आहे. यात दीर्घ काळासाठी भरपूर पैशांची भर पडू शकते. या योजनेत तुमच्यासाठी २,००,००,००० रुपयांपेक्षा जास्त रिटायरमेंट फंड जोडला जाऊ शकतो, परंतु यासाठी तुम्हाला वयाच्या किमान २५ व्या वर्षापासून गुंतवणुकीला सुरुवात करावी लागेल.
4 / 8
पीपीएफ योजनेच्या माध्यमातून २ कोटींपेक्षा जास्त पैसे कमावण्यासाठी तुम्हाला ५-५ वर्षांच्या ब्लॉकमध्ये ही योजना वाढवावी लागेल. तेही ४ वेळा. म्हणजेच ही योजना १५ वर्षात मॅच्युअर होते, पण तुम्हाला ही योजना ३५ वर्षे चालवावी लागेल. तसंच या योजनेत वार्षिक दीड लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. सध्या या योजनेवर ७.१ टक्के व्याज मिळत आहे.
5 / 8
जर तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि १.५ लाख रुपयांची वार्षिक गुंतवणूक ३५ वर्षे सुरू ठेवली तर तुम्ही ३५ वर्षांत एकूण ५२,५०,००० रुपयांची गुंतवणूक कराल. ७.१% दरानं तुम्हाला १,७४,४७,८५७ रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे ३५ वर्षांत तुम्हाला मॅच्युरिटी अमाउंट म्हणून एकूण २,२६,९७,८५७ रुपये मिळतील.
6 / 8
पीपीएफचं एक्सटेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज सादर करावा लागेल, जिथे तुमचे खातं आहे. मुदतपूर्तीच्या तारखेपासून १ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी आपल्याला हा अर्ज सादर करावा लागेल आणि मुदतवाढीसाठी फॉर्म भरावा लागेल. ज्या पोस्ट ऑफिस/बँकेच्या शाखेत पीपीएफ खातं उघडण्यात आलं आहे, त्याच पोस्ट ऑफिस/बँकेच्या शाखेत फॉर्म जमा करता येऊ शकतो. जर तुम्ही हा फॉर्म वेळेत सबमिट करू शकला नाही तर तुम्ही खात्यात योगदान देऊ शकणार नाही.
7 / 8
पीपीएफचा एक फायदा म्हणजे ही योजना ईईई श्रेणीत ठेवल्यामुळे तीन प्रकारे करबचत होते. पीपीएफमध्ये जमा केलेले पैसे, मिळणारं व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम पूर्णपणे करमुक्त असते.
8 / 8
जर तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तुम्ही ६० वर्षात स्वतःला कोट्यधीश बनवू शकता आणि तुम्ही आपल्या वृद्धापकाळाची चिंता दूर करू शकता.
टॅग्स :PPFपीपीएफInvestmentगुंतवणूक