PPF की SIP... कोणती स्कीम लवकर बनवू शकते करोडपती; ₹१,५०,००० च्या वार्षिक गुंतवणूकीचं गणित पाहा
By जयदीप दाभोळकर | Updated: March 22, 2025 08:55 IST
1 / 7PPF Vs SIP Investment: पीपीएफ आणि एसआयपी या दोन्ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीनं खूप चांगल्या मानल्या जातात. फरक एवढाच आहे की एक योजना निश्चित परतावा देणारी आहे आणि दुसरी योजना बाजारातील जोखमीवर अवलंबून आहे. म्हणजेच जर तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला सरकारकडून निश्चित व्याज मिळेल, तर एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला बाजारानुसार परतावा मिळेल.2 / 7पीपीएफमध्ये वर्षाला तुम्ही जास्तीत जास्त १.५ लाख रुपये म्हणजेच दरमहा १२,५०० रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता. दरम्यान, पीपीएफ आणि एसआयपीमध्ये दरमहा १२,५०० रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला किती परतावा मिळेल, तसंत कोणती योजना तुम्हाला लवकर करोडपती बनवू शकते जाणून घेऊ.3 / 7आधी पीपीएफबद्दल बोलूया. सरकारची ही योजना १५ वर्षात मॅच्युअर होते, पण तुम्हाला हवं असेल तर ५-५ वर्षांच्या ब्लॉकमध्ये ती वाढवू शकता. जर तुम्ही यात दरमहा १२,५०० रुपये गुंतवले तर १५ वर्षांत तुम्ही २२,५०,००० रुपये गुंतवाल आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला ४०,६८,२०९ रुपये मिळतील.4 / 7पीपीएफमधून कोट्यधीश होण्यासाठी तुम्हाला ती वाढवावी लागते आणि तीही ५-५ वर्षांच्या ब्लॉकमध्ये २ वेळा. म्हणजेच पीपीएफमध्ये ही गुंतवणूक तुम्हाला २५ वर्षे सुरू ठेवावी लागेल. १२,५०० रुपयांच्या मासिक गुंतवणुकीनुसार तुम्हाला २५ वर्षांत एकूण ३७,५०,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल आणि त्यानंतर मॅच्युरिटीवर तुम्हाला १,०३,०८,०१५ रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्ही २५ वर्षात करोडपती बनू शकाल.5 / 7जर तुम्ही एसआयपीमध्ये महिन्याला १२,५०० रुपये म्हणजेच वार्षिक १.५ लाख रुपयांची गुंतवणूक करत असाल तर कोट्यधीश होण्यासाठी तुम्हाला सलग १९ वर्षे गुंतवणूक करावी लागेल. १९ वर्षात तुमची एकूण २८,५०,००० रुपयांची गुंतवणूक होईल. एसआयपीचा सरासरी परतावा सुमारे १२ टक्के असल्याचं मानलं जातं. अशा तऱ्हेनं जर तुम्ही १२% परताव्यानुसार हिशोब केला तर तुम्हाला व्याज म्हणून ७२,७३,७८२ रुपये मिळतील, अशा प्रकारे तुम्हाला १९ वर्षात एकूण १,०१,२३,७८२ रुपये मिळतील आणि तुम्ही करोडपती होऊ शकता.6 / 7जर तुम्ही २५ वर्षांसाठी १२,५०० रुपयांची गुंतवणूक करत असाल तर तुम्ही पीपीएफच्या बरोबरीनं एकूण ३७,५०,००० रुपयांची गुंतवणूक कराल, परंतु १२ टक्के दरानं तुम्हाला त्यावरील व्याजातून १,७५,२७,५८२ रुपये मिळू शकतात. २५ वर्षात तुम्हाला एकूण २,१२,७७,५८२ रुपये मिळू शकतात.7 / 7(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)