शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पॅन केवळ १० अक्षरं नाही तर तुमची आर्थिक कुंडली आहे; प्रत्येक अक्षराचा अर्थ समजून घ्या, अन्यथा होईल नुकसान

By जयदीप दाभोळकर | Updated: May 28, 2025 09:20 IST

1 / 9
आपण आपल्याकडे अनेक प्रकारची कार्ड बाळगत असतो, पण यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॅन कार्ड (पर्मनंट अकाउंट नंबर). पॅन कार्ड म्हणजे केवळ प्लॅस्टिकचा तुकडा नाही, तर ते तुमचं 'फायनान्शियल आयडेंटिटी कार्ड' आहे. इन्कम टॅक्स भरण्यापासून ते बँक खातं उघडण्यापर्यंत, मालमत्ता खरेदीपासून मोठी गुंतवणूक करण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी पॅनकार्डची गरज असते.
2 / 9
तुम्हाला माहित आहे का तुमच्या पॅन कार्डवर लिहिलेली १० अक्षरं काही साधीसुधी अक्षरं नाहीत. त्यांना एक वेगळा अर्थ असतो. आपल्या ओळखीशी निगडित 'सिक्रेट कोड' असतात. त्यामुळे जर तुम्हाला हे कोड समजले नाहीत किंवा पॅन कार्डच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला भविष्यात अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.
3 / 9
पॅन कार्डावर कार्डधारकाचं नाव आणि जन्म तारीख लिहिलेली असते. परंतु पॅन कार्डच्या नंबरमध्ये तुमचं आडनावही असतं. पॅन कार्डाचं पाचवं डिजिट तुमचं आडनाव दर्शवतं.
4 / 9
इन्कम टॅक विभाग कार्डधारकाच्या आडनावालाच आपल्या डेटामध्ये नोंद करून ठेवतं. यासाठीच अकाऊंट नंबरमध्ये त्याची माहिती असते. याची माहिती टॅक्स डिपार्टमेंट कार्डधारकाला देत नाही.
5 / 9
पॅन कार्ड क्रमांक हा १० अंकी खास क्रमांक आहे, जो लॅमिनेटेड कार्डच्या स्वरूपात येतो. जे लोक पॅन कार्डसाठी अर्ज करतात त्यांना आयकर विभाग ते जारी करतो. पॅनकार्ड बनल्यानंतर त्या व्यक्तीचे सर्व आर्थिक व्यवहार विभागाच्या पॅनकार्डशी लिंक केले जातात. यामध्ये कर भरणा, क्रेडिट कार्डद्वारे होणारे आर्थिक व्यवहार हे सर्व विभागाच्या देखरेखीखाली होते.
6 / 9
या नंबरच्या सुरुवातीचे तीन डिजीट इंग्रजी अक्षरं असतात. हे AAA पासून ZZZ पर्यंत कोणतेही असू शकतात. सध्या सुरु असलेल्या सीरिजनुसार ते ठरवले जातात. विभाग आपल्या प्रमाणे ते ठरवत असतं. पॅन नंबरचं चौथं डिजीटही एक अक्षर असतं. परंतु ते कार्डधारकाचं स्टेटस सांगतं.
7 / 9
यामध्ये चौथं डिजीट पुढील पैकी काहीही असू शकतं. P - सिंगल पर्सन, F - फर्म, C - कंपनी, A - एसोसिएशन ऑफ पर्सन, T - ट्रस्ट, H - हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली, B - बॉडी ऑफ इंडिविज्युअल, L - लोकल, J - आर्टिफिशिअल ज्युडिशिअल पर्सन, G - सरकारसाठी
8 / 9
पॅन कार्डाच्या पाचव्या डिजीट म्हणजे इंग्रजी अक्षरच असतं. ते तुमच्या आडनावाचं पहिलं अक्षर असतं. यानंतर पॅन कार्डात चार क्रमांक असतात. ते ०००१ पासून ९९९९ पर्यंत कोणतेही असू शकतात.
9 / 9
तुमच्या पॅन कार्डाचे नंबर्स सीरिज दर्शवतात. याचं अखेरचं डिजीट एक अल्फाबेट असतं, जे कोणतंही लेटर असू शकतं. दरम्यान, आर्थिक व्यवहारासांठी पॅन कार्ड आवश्यक आहे. तुम्ही तुमचा पत्ता बदलला तरी पॅन कार्डाचा क्रमांक बदलत नाही. पॅन कार्ड हे एका आयडीच्या स्वरूपातही वापरू शकता.
टॅग्स :Pan Cardपॅन कार्डGovernmentसरकार