शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tax Saving साठी ३१ मार्चपर्यंत संधी; ‘या’ ७ स्कीम्समध्ये करू शकता गुंतवणूक, पटापट चेक करा

By जयदीप दाभोळकर | Updated: March 18, 2025 09:28 IST

1 / 8
Tax Saving Investment: जर तुम्ही कराच्या कक्षेत येत असाल आणि तुम्ही अद्याप कर वाचवण्यासाठी आवश्यक गुंतवणूक केली नसेल तर ती त्वरीत करा, कारण तुमच्याकडे कर बचतीसाठी फक्त थोडा वेळ शिल्लक आहे. चालू आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२५ रोजी संपणार असून नवीन आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होणार आहे. आज आपण अशा योजनांवर एक नजर टाकूया ज्यामध्ये आपण आपल्या कष्टानं कमावलेल्या पैशाचा मोठा भाग वाचवू शकता.
2 / 8
पब्लिक प्रॉव्हिडंट फंडला सामान्यत: पीपीएफ म्हणतात. ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये आपल्याला खात्रीशीर परतावा मिळतो आणि आपली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. पीपीएफ १५ वर्षांनंतर मॅच्युअर होतो म्हणजेच ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. त्यावर सध्या ७.१ टक्के दरानं व्याज मिळत आहे. पीपीएफमध्ये केलेली गुंतवणूक ई-ई-ई श्रेणीत ठेवली जाते. म्हणजेच तुमची गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे. पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास आयकराच्या कलम ८० सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत करसवलत मिळते.
3 / 8
जर तुम्हाला टॅक्स वाचवायचा असेल तर तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजेच एनपीएसमध्येही गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला ८० सी अंतर्गत मिळणारी सूट आणि ८० सीसीडी (१ बी) अंतर्गत ५० हजार रुपयांची कर सवलत मिळू शकते. निवृत्ती नियोजनाच्या दृष्टीने ही चांगली योजना आहे. यामध्ये तुम्ही दरवर्षीच्या गुंतवणुकीवर करसवलतीसह वृद्धापकाळातील पेन्शनचा ही लाभ घेऊ शकता.
4 / 8
म्युच्युअल फंडांच्या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) हा एक पर्याय आहे जो चांगल्या परताव्यासह कर बचत करण्यास मदत करतो. यामध्ये तुम्ही कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतचा कर वाचवू शकता, तसंच मोठा फंडही तयार करू शकता. ईएलएसएस हे सर्वात कमी लॉक-इन कालावधी असलेलं उत्पादन आहे. ईएलएसएसमधील गुंतवणूक ३ वर्षांपर्यंत रिडीम करता येत नाही. मात्र, त्याची जोखीम समजून घेऊनच पैसे गुंतवावेत.
5 / 8
जर तुम्ही एखाद्या मुलीचे आई-वडील असाल तर तिचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करू शकता. सध्या त्यावर ८.२ टक्के दरानं व्याज मिळत आहे. या योजनेचा फायदा म्हणजे तुमच्या मुलीसाठी चांगली रक्कम जमा होईल, तसंच ८० सी अंतर्गत तुम्ही वर्षाकाठी १.५ लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. या योजनेत कमीत कमी २५० रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते आणि जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खातं उघडता येतं.
6 / 8
ज्येष्ठ नागरिक बचत योजना अर्थात एससीएसएस ही सरकारकडून वृद्धांसाठी चालवली जाणारी विशेष योजना आहे. पोस्ट ऑफिस बचत योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवर ८.२० टक्के दरानं व्याज मिळत आहे. या योजनेअंतर्गत १००० रुपयांपासून ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आहे. याद्वारे खातेदार आयटीआर भरताना कलम ८० सी अंतर्गत करसवलतीचा दावा करू शकतात.
7 / 8
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) ही देखील सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देणारी योजना आहे. कोणताही भारतीय नागरिक यात गुंतवणूक करू शकतो. एनएससीमध्ये गुंतवणूक १००० रुपयांपासून सुरू केली जाऊ शकते. जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. सध्या ७.७ टक्के दरानं व्याज दिलं जात आहे. हे खातं देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येतं. ८० सी अंतर्गत करसवलतीचा ही लाभ यात मिळतो.
8 / 8
जर तुम्हाला ५ वर्षांसाठी फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफडी मिळाली तर त्यावर तुम्हाला टॅक्स डिस्काऊंटचा फायदा मिळतो. त्यामुळे या एफडीला टॅक्स सेव्हिंग एफडी असंही म्हणतात. बँकेत तसंच पोस्ट ऑफिसमध्ये टॅक्स सेव्हिंग एफडीचा पर्याय तुम्हाला मिळतो. व्याजदर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात. आपण आपल्या फायद्यानुसार व्याजदर पाहून गुंतवणूक करू शकता. तसंच ८० सी अंतर्गत करसवलतीचा लाभही घेता येते.
टॅग्स :InvestmentगुंतवणूकGovernmentसरकारIncome Taxइन्कम टॅक्स